‘तू सूरज, मैं सांझ पियाजी’ मालिकेत अविनाश रेखीने बनवले ‘सिक्स पॅक अॅब्स
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2017 09:42 AM2017-03-17T09:42:26+5:302017-03-17T15:12:26+5:30
‘तू सूरज, मैं सांझ पियाजी’ या नव्या मालिकेतील नायकाच्या भूमिकेतून अविनाश रेखी पुन्हा एकदा छोट्य़ा पडद्यावर कमबॅक करतोय. मालिकेत ...
‘ ू सूरज, मैं सांझ पियाजी’ या नव्या मालिकेतील नायकाच्या भूमिकेतून अविनाश रेखी पुन्हा एकदा छोट्य़ा पडद्यावर कमबॅक करतोय. मालिकेत तो रिहा शर्माचा नायक उमाशंकरची भूमिका साकारणार आहे. अविनाशने यापूर्वी 'मधुबाला' आणि 'छल' यासारख्या मालिकांमधून शक्तिशाली तरुणाच्या भूमिका साकारल्या होत्या.निर्मात्यांना या भूमिकेसाठी देखणा आणि सुदृढ व्यक्तिमत्त्वाच्या कलाकाराची गरज होती आणि अविनाश त्या कसोटीला पुरेपूर उतरला.मालिकेच्या पहिल्याच भागात अविनाश आपल्या दणकट शरीरयष्टीचे प्रदर्शन करणार आहे.केवळ धोतर नेसलेल्या अविनाशचे दर्शन प्रेक्षकांना घडेल. अविनाश यात उमाशंकर या कट्टर परंपरानिष्ठ व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. “माझी या मालिकेसाठी निवड झाल्यापासून मी नियमित व्यायाम आणि आहार सुरू केला. मी यूट्य़ूबवर ‘केटो’ या आहारशास्त्राची माहिती मिळविली. त्यात तुम्ही फक्त पाणी आणि प्रथिने यांचंच सेवन करता.तो आहार मी पुढील 10 दिवस घेतला.
मी कोणा प्रशिक्षकाची नियुक्ती केली नाही. मी फक्त योग्य डाएटची माहिती मिळवली. मी नियमित व्यायाम केला, आहारावर नियंत्रण ठेवलं आणि 10 दिवसांनंतर पायलट भागाचं चित्रीकरण केलं,तेव्हा माझे ‘सिक्स पॅक अॅब्ज’ दिसू लागले होते. गेले सहा ते आठ महिने मी हेच नियम पाळत आहे. यादरम्यान मला या मालिकेत अनेकदा उघड्य़ाने, शरीरसौष्ठव दाखवीत चित्रीकरण करावं लागलं होतं,” असे अविनाशने सांगितले.‘दिया और बाती हम’ या मालिकेचा हा पुढील भाग आहे. तिचा पहिलाच प्रसंग केरळमधील एका निसर्गरम्य स्थळावर चित्रीत करण्यात आला आहे. याच ठिकाणी ‘बाहुबली’ चित्रपटातील धबधब्याच्या प्रसंगाचे चित्रीकरण करण्यात आले होते. या प्रसंगात अविनाशच्या अंगावर केवळ धोतर, कपाळावर टिळा आणि ऑक्सिडाइज्ड दागिने आहेत. कपाळावरील टिळा हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहे.शिवाय त्याने अंगात जानवेही घातले आहे, जे तो ब्राह्मण असल्याची खूण आहे. ‘तू सूरज, मैं सांझ पियाजी’ ही प्रामुख्याने कनक राठी (रिहा शर्मा) आणि उमाशंकर (अविनाश) यांची प्रेमकथा आहे. दोन अगदी भिन्न विचारांच्या व्यक्तींना नियती एकत्र आणते. भु-या रंगाचे डोळे आणि पीळदार शरीरयष्टी असलेला हा कलाकार या मालिकेत अगदी वेगळ्य़ाच अंदाजात दिसणार आहे.