अभिनयानंतर अविनाश सचदेवला आता करायची आहे चित्रपटनिर्मिती!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 11:31 AM2017-09-25T11:31:49+5:302017-09-25T17:01:49+5:30
‘आयुष्यमान भव’ या सूडकथेत अविनाश दुबे या व्यक्तिरेखेत अभिनेता अविनाश सचदेवाने आपला प्रभाव कायम राखला असला, तरी त्याच्याबद्दलच्या काही ...
‘ युष्यमान भव’ या सूडकथेत अविनाश दुबे या व्यक्तिरेखेत अभिनेता अविनाश सचदेवाने आपला प्रभाव कायम राखला असला, तरी त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी ब-याच जणांना ठाऊक नाहीत. त्यापैकी एक म्हणजे, त्याला आता चित्रपटनिर्मिती करायची आहे. यासंदर्भात अविनाशला विचारले असता तो म्हणाला,विविध जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणूनही काम केलं. जाहिराती करता करता एक दोन मालिकांमध्ये छोट्या छोट्या भूमिकाही साकारल्या. “मी ‘हातिम’ या मालिकेत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून माझ्या कारकीर्दीला प्रारंभ केला होता आणि तेव्हापासूनच मला चित्रपटनिर्मितीचं आकर्षण वाटत आलं आहे. त्यासाठी मी परदेशात जाऊनही चित्रपटनिर्मितीचा अभ्यासक्रम केला होता.त्यात ते काय शिकवितात, ते मला जाणून घ्यायचं होतं.अभिनयाशिवाय भविष्यात मला सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग करायला आवडेल. शिवाय संधी मिळाली तर दिग्दर्शनच्या क्षेत्रातही करियर करायला आवडेल. ज्याला दिग्दर्शनाची माहिती आहे तो उत्तम अभिनेता बनू शकतो किंवा याउलटही होऊ शकते. त्यामुळे भविष्यात मला बॉलिवूड सिनेमांचं दिग्दर्शन करायलाही आवडेल.तसंच ज्या कलाकाराला दिग्दर्शनाची जाण असते, तो उत्तम अभिनेता बनू शकतो आणि तेच उलट बाजूनेही सत्य आहे, असं मला वाटतं.”‘आयुष्यमान भव’ ही क्रिश नावाच्या एका आठ वर्षांच्या मुलाची कथा आहे. त्याला त्याच्या वयाच्या मुलांप्रमाणेच खेळण्यांशी खेळायला आणि इतरांच्या खोड्य़ा काढायला आवडत असतं. त्याचे कुटुंबीय आणि मित्रांचा तो लाडका असतो. पण तो आठ वर्षांचा असताना त्याला त्याच्या पूर्वजन्मातील काही कटू आठवणी दिसू लागतात आणि त्याचे हे निरागस जीवन संपुष्टात येते.छोटी बहू या मालिकेतील देव या भूमिकेनं अविनाश सचदेव प्रसिद्धीच्या झोतात आला. यानंतर त्यानं विविध मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिकाही साकारल्या आहेत. याशिवाय अभिनय कारर्किदीत बिग बींच्या बायोपिक सिनेमात काम करण्याचंही त्याचं स्वप्न आहे. सध्या विविध व्यक्तींच्या जीवनावरील सिनेमांचा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे मलाही भविष्यात बायोपिक सिनेमामध्ये काम करायला आवडेल असे त्याने सांगितले.तसेच सिनेमात जसे बॉलिवूड कलाकार मेहनत घेतात तसीच मेहनत त्याने या मालिकेसाठी घेतली आहे.त्यामुळे मालिका नाही तर सिनेमाप्रमाणेच काम करत असल्याचे तो सांगतो.