अवधुत गुप्ते सगरममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 10:14 AM2017-03-25T10:14:41+5:302017-03-25T15:44:41+5:30

अवधूत गुप्ते हा एक प्रसिद्ध गायक, संगीतकारसोबतच यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शकदेखील आहे. अवधुत अशा विविध गोष्टी करत असला तरी ...

Awadhoot Gupte in Sagarma | अवधुत गुप्ते सगरममध्ये

अवधुत गुप्ते सगरममध्ये

googlenewsNext
धूत गुप्ते हा एक प्रसिद्ध गायक, संगीतकारसोबतच यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शकदेखील आहे. अवधुत अशा विविध गोष्टी करत असला तरी त्याचे पहिले प्रेम हे गाणेच आहे. मेरी मधुबाला, जय जय महाराष्ट्र माझा यांसारख्या गाण्यामुळे अवधूत खऱ्या अर्थाने नावारूपाला आला. आज मराठीतील यशस्वी गायक, दिग्दर्शकांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. त्याने मराठीसोबतच हिंदी गाणीदेखील गायली आहे. तो स्वतंत्रपणे संगीत-अल्बमसाठी संगीतदेखील देतो. तसेच त्याने छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील केले आहे. तसेच त्याने अनेक कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारली होती. 
पाऊस या अल्बमामार्फत गायक आणि संगीतकार म्हणून अवधूतचे संगीत क्षेत्रात पदार्पण झाले. त्यानंतर वैशाली सामंतसोबत त्याने बनवलेल्या ऐका दाजीबा हा अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला. 
सरगम या कार्यक्रमात अवधूत गुप्ते गुढी पाडव्याच्या निमित्ताने जय जय महाराष्ट्र माझा हे गाणे गाणार आहेत. त्याचबरोबर कांदे पोहे, ही गुलाबी हवा, हे लंबोदर, दिपाडी दीपांग ही गाणी तर तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, राँग नंबर, आम्ही लग्नाळू, सखे तुझ्या नावाचं येडं  लागलं आणि परी म्हणू की सुंदरा ही गाणी गाणार आहेत. अवधूत त्याचे सगळ्यात प्रसिद्ध गाणे ऐका दाजीबा या कार्यक्रमात आपल्याला एका वेगळ्याच अंदाजात ऐकवणार आहे.
सरगम या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला कोठारे करत असून आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचा क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माता आहे. या कार्यक्रमाचे शीर्षक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकरने ते लिहिले आहे तर सिद्धार्थ आणि सौमिल यांनी ते संगीतबद्द केले आहे. 


Web Title: Awadhoot Gupte in Sagarma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.