'आई तुळजाभवानी' मालिकेत जागर स्त्रीशक्तीचा साक्षात्कार अलौकिक दैवी रूपांचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:07 IST2025-03-07T17:06:18+5:302025-03-07T17:07:02+5:30
Aai Tulja Bhavani : 'आई तुळजाभवानी'च्या आगामी भागात देवीच्या सामर्थ्याचा अद्वितीय प्रवास पाहायला मिळणार आहे. देवीच्या शक्ती आणि कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी मालिकेत एक रोमांचक वळण येणार आहे.

'आई तुळजाभवानी' मालिकेत जागर स्त्रीशक्तीचा साक्षात्कार अलौकिक दैवी रूपांचा
कलर्स मराठीवरील 'आई तुळजा भवानी'(Aai Tulja Bhavani Serial)च्या आगामी भागात देवीच्या सामर्थ्याचा अद्वितीय प्रवास पाहायला मिळणार आहे. देवीच्या शक्ती आणि कर्तृत्वाचा जागर करण्यासाठी मालिकेत एक रोमांचक वळण येणार आहे. भवानी शंकरांसोबतचा संवाद आणि त्यातून उलगडणारे अलौकिक दैवी रूपे प्रेक्षकांना थक्क करणारी आहेत. देवीच्या विविध रूपांची महती, तिचं भक्तांवरचं प्रेम आणि राज्याभिषेकाच्या माध्यमातून तिच्या शक्तिपीठाचं अधिकृतपणे प्रतिष्ठापन करण्याचा निर्णय यामुळे या भागात स्त्रीशक्तीचा जागर अनुभवायला मिळणार आहे.
देवीचं जगत जननी रूप, तुळजाभवानीपासून महाकालीपर्यंतचा प्रवास आणि भवानीशंकरांचं मार्गदर्शन या सगळ्यांतून स्त्रीशक्तीची अपार ताकद आणि तिचा आदर अधोरेखित होतो. या आगळ्यावेगळ्या भागात देवीचं साम्राज्ञी होण्याचं गूढ आणि त्यामागील कारणं उलगडली जाणार आहेत. देवीच्या राज्याभिषेकासाठी भवानीशंकरांचं वचन आणि त्यामधील श्रद्धा पाहून प्रेक्षक निश्चितच भारावून जाणार आहेत. आई तुळजाभवानीचा राज्याभिषेक करून घेण्यास नकार आहे. भवानी शंकर तुळजा भवानीला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत.
तू साक्षात जगत जननी आहेस, तुला खरतर ह्या या गोष्टींची आवश्यकता नाही तू साम्राज्ञी आहे पण ह्याची आवश्यकता तुला नाही तर ती भक्तांना आहे.....प्रजेला आहे…प्रजेचा अंतिम आधार हा त्याचा राजाच असतो… कुठलही संकट आलं तर ते त्याकडेच पाहतात…त्यांच्यासाठी तोच आधार असतो … आणि तू तेच केलं आहेस..... आदिशक्ती, पार्वती, त्वरिता, शाकंबरी, महाकाली देखील तूच आहेस. आता आई तुळजाभवानी राज्याभिषेक करण्यास तयार होणार का ? महादेवांनी तुळजा भवानीला काय वचन दिले आहे ? हे कळेलच.