आशीर्वाद घेण्यासाठी अयान खानने दिली चंद्रशेखर पार्कला भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 11:06 AM2018-03-16T11:06:14+5:302018-03-16T16:36:14+5:30

थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर आधारित ‘चंद्रशेखर’ ही मालिका ‘स्टार भारत’ने नुकतीच प्रसारित केली असून त्याद्वारे जनतेला निर्भय ...

Ayan Khan meets Chandrasekhar Park to receive blessings! | आशीर्वाद घेण्यासाठी अयान खानने दिली चंद्रशेखर पार्कला भेट!

आशीर्वाद घेण्यासाठी अयान खानने दिली चंद्रशेखर पार्कला भेट!

googlenewsNext
र क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनावर आधारित ‘चंद्रशेखर’ ही मालिका ‘स्टार भारत’ने नुकतीच प्रसारित केली असून त्याद्वारे जनतेला निर्भय बनण्याचा संदेश देण्याचा निर्मात्यांचा हेतू आहे. या मालिकेत बालपणीच्या चंद्रशेखर यांची भूमिका अयान झुबेर रेहमानी हा आठ वर्षांचा बालकलाकार रंगवीत आहे. चंद्रशेखर यांच्यासारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाची व्यक्तिरेखा साकारण्यास मिळत असल्यामुळे अयान खूपच आनंदित झाला आहे. चंद्रशेखर यांनी अलाहाबादमध्ये स्वत:वर गोळी झाडून घेऊन देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या शहरातील चंद्रशेखर आझाद उद्यानात चंद्रशेखर आझाद यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे. या मालिकेचे प्रसारण सुरू होण्यापूर्वी आपल्याला अलाहाबादला आणि या उद्यानाला भेट द्याची आहे, असा आग्रह अयानने धरला. चंद्रशेखर यांच्या पुतळ्याकडून आपल्याला आशीर्वाद घ्यायचे असून आपल्याला त्यांना आदरांजली वाहायची आहे, असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने या उद्यानाला भेट देऊन त्यांच्या पुतळ्यावर फुले अर्पण केली आणि या मालिकेच्या यशासाठी प्रार्थना केली.

अयान सांगतो, “चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या महान क्रांतिकारक नेत्याची व्यक्तिरेखा साकार करण्याची संधी मला मिळत असल्याने मी सध्या देशातील सर्वात भाग्यवान कलाकार आहे. या मालिकेच्या प्रसारणापूर्वी मला त्यांच्या शहराला भेट द्यायची होती आणि त्यांच्या पुतळ्याकडून आशीर्वाद घ्यायचे होते. त्यांच्या पुतळ्याच्या दर्शनाने मला त्यांची व्यक्तिरेखा साकारण्याची ताकद आणि प्रेरणा मिळाली.” 

ज्योती, एक वीर की अरदस- वीरा आणि शेर-ए- पंजाब :महाराजा रणजितसिंग या मालिकांमध्ये नायकांच्या मातेची भूमिका साकारल्यावर स्नेहा वाघ आता पुन्हा एकदा आईच्या भूमिकेत दिसणार आहे.‘स्टार भारत’वरील ‘चंद्रशेखर’या आगामी भव्य आणि महत्त्वपूर्ण मालिकेत ती 'चंद्रशेखर' यांची माता जगरानी तिवारी यांची भूमिका उभी साकारणार आहे.

Web Title: Ayan Khan meets Chandrasekhar Park to receive blessings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.