शूटिंगदरम्यान या मालिकेच्या सेटला लागली होती आग, उपस्थित होती संपूर्ण कास्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 16:56 IST2019-09-10T16:56:17+5:302019-09-10T16:56:36+5:30
सेटवर अचानक आग लागली. आग वाढण्याआधीच त्याच्यावर नियंत्रण आणण्यात आलं.

शूटिंगदरम्यान या मालिकेच्या सेटला लागली होती आग, उपस्थित होती संपूर्ण कास्ट
कलर्स टीव्हीवरील मालिका बहू बेगमच्या सेटवर काही दिवसांपूर्वी एक घटना घडली आहे. सेटवर अचानक आग लागली. आग वाढण्याआधीच त्याच्यावर नियंत्रण आणण्यात आलं. मुंबईतील अंधेरीतील एसजे स्टुडिओमध्ये आग लागली होती. त्यावेळी या मालिकेतील संपूर्ण कास्ट उपस्थित होती.
स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, आग लागली त्यादरम्याम मालिकेत बेगम रजिया मिर्झाची भूमिका साकारणारी सिमोन सिंग तिचे सीन चित्रीत करत होती. यावेळी अचानक सेटवरील बॅटरीचा ब्लास्ट झाल्यामुळे आग लागली.
मालिकेशी संबंधीत सूत्रांनी स्पॉटबॉयला दिलेल्या माहितीनुसार, सेटवर आग लागली ती सुदैवानं जास्त वाढली नाही. देवाच्या कृपेनं काही नुकसान झालं नाही. सेटवर ठेवलेल्या बॅटरीमध्ये अचानक ब्लास्ट झाला होता. त्यामुळे जवळपासच्या फॅब्रिक्समध्ये आग लागली. आग लागल्यावर सेटवरील सर्वांना बाहेर काढण्यात आलं व आग विझवण्यात आली. सेटवरील काही भाग डॅमेज झाला. पण जास्त नुकसान झालं नाही.
कलर्स टीव्ही वाहिनीवरील बहू बेगम मालिकेत भोपाळमधील एका मुस्लीम कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. ही मालिका प्रेक्षकांना खूप भावते आहे. या मालिकेत सध्या लव ट्रायगंल ट्रॅक चालू आहे.