'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'बाईपण भारी देवा'ची धमाल, कलाकारांचा डान्स व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 18:13 IST2024-05-11T18:12:44+5:302024-05-11T18:13:43+5:30
बाईपण भारी देवाची टीम घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या शीर्षक गीतावर परफॉर्म करणार आहे.

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'बाईपण भारी देवा'ची धमाल, कलाकारांचा डान्स व्हिडिओ व्हायरल
स्टार प्रवाहच्या 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत सध्या ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. हळद आणि मेहंदीचा कार्यक्रम थाटात पार पडल्यानंतर आता लगबग सुरु आहे ती म्हणजे संगीत सोहळ्याची. या खास सोहळ्यासाठी ऋषिकेश, जानकी, सारंग, ऐश्वर्या आणि संपूर्ण कुटुंबासोबतच खास पाहुणेही परफॉर्म करणार आहेत. स्टार प्रवाहच्या परिवारातील सिंधू-राघव, सागर-मुक्तासोबतच महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट बाईपण भारी देवाची टीमही सारंग आणि ऐश्वर्याला शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत.
बाईपण भारी देवाची टीम घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या शीर्षक गीतावर परफॉर्म करणार आहे. १९ मे ला सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर 'बाईपण भारी देवा' चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन होणार आहे. त्यानिमित्ताने या टीमने घरोघरी मातीच्या चुली मालिकेत खास हजेरी लावली. यावेळी सविता प्रभूणे यांनी सुकन्या मोने, शिल्पा नवलकर यांच्या सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत डान्स केला. त्यांचा स्टेजवरील डान्स परफॉर्मन्स पाहून मराठी प्रेक्षक खूश झालेत.
'बाईपण भारी देवा' ची टीम मालिकेच्या या एपिसोडमध्ये सहभागी झाल्याने सर्वांमध्येच उत्साह पाहायला मिळाला. हा एपिसोड पाहायलाही नक्कीच मजा येणार आहे. सध्या मालिका टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.