प्री-मॅच्युअर बाळापासून २० दिवस दूर राहिली अभिनेत्री, सांगितलं आपल्या मनातलं दु:ख; म्हणाली- तो काळ माझ्यासाठी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 06:50 PM2023-05-17T18:50:28+5:302023-05-17T18:54:47+5:30

प्री-मॅच्युअर डिलिव्हरीमुळे ती अनेक दिवस आपल्या मुलीपासून दूर राहिली, आता अभिनेत्रीने आपलं दु:ख सांगितलं आहे.

Balika vadhu fame neha marda pain reflected on being away from premature daughter for 20 days know details | प्री-मॅच्युअर बाळापासून २० दिवस दूर राहिली अभिनेत्री, सांगितलं आपल्या मनातलं दु:ख; म्हणाली- तो काळ माझ्यासाठी...

प्री-मॅच्युअर बाळापासून २० दिवस दूर राहिली अभिनेत्री, सांगितलं आपल्या मनातलं दु:ख; म्हणाली- तो काळ माझ्यासाठी...

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' या मालिकेत नेहा मर्दाने गेहनाची भूमिका साकारून बरीच वाहवा मिळवली. नेहा तिच्या प्रत्येक भूमिकेत जीव ओतला आहे. अलीकडेच या अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. परंतु प्री-मॅच्युअर डिलिव्हरीमुळे ती अनेक दिवस आपल्या मुलीपासून दूर राहिली, तिला ब्रेस्टफिडिंग ही करता आले नाही. आता अभिनेत्रीने आपलं दु:ख सांगितलं आहे.

नेहाच्या प्रेग्नेंसीमध्ये अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे अभिनेत्रीची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाली आणि तिच्या बाळाचा जन्मही वेळेआधीच झाला. त्यामुळे नेहाला 20 दिवस तिच्या लहान मुलीपासून दूर राहावे लागले, कारण तिला एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. आता नेहा आपला सगळा वेळ फक्त आणि फक्त आपल्या मुलीला देत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, तिने २१ व्या दिवशी आपल्या मुलीला मिठी मारल्यावर तिच्या भावना व्यक्त  केल्या. 


तिच्या एका मुलाखतीत नेहाने सांगितले की, 'फीडिंगची वेळ खूप रंजक आहे कारण ती अनेक वेळा क्लस्टर फीडिंग करते, जी तिच्यासाठी एक नवीन गोष्ट आहे. ती म्हणते की आई झाल्यावर तिला खूप छान वाटत आहे आणि हा आनंद तिला खरोखरच मिळाला आहे यावर विश्वास बसत नाही आहे. 20 दिवस बाळापासून दूर राहणं तिच्यासाठी सोपे नव्हते. ती तिला कुशीत घेऊ शकत नव्हती, फक्त पाहू शकत होती. ती म्हणते, 'मला माझे दूध काढून त्याच्याकडे पाठवायचे होते. मला तिला फिट करायची परवानगी नव्हती, तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता.


नेहा मर्दा ही छोट्या पडद्यावरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 'डोली अरमानो की', 'बालिका वधू', 'क्यों रिश्तों में कट्टी बट्टी' आणि 'पिया अलबेला' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर ही अभिनेत्री आई झाली आहे. 
 

Web Title: Balika vadhu fame neha marda pain reflected on being away from premature daughter for 20 days know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.