बालिका वधू फेम सुरेखा सीकरींना हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, शूटिंग पूर्वी करावी लागेल फिजिओ थेरेपी
By गीतांजली | Published: September 25, 2020 02:16 PM2020-09-25T14:16:14+5:302020-09-25T14:29:41+5:30
बालिका वधू फेम ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.
बालिका वधू फेम ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. नॅशनल अॅवॉर्ड विजेता अभिनेत्री सुरेखा सीकरी यांना काही दिवसांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आला होता त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये जवळपास 15 दिवस ट्रिटमेंट घेतल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली आहे.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार सुरेखा यांच्यावर उपचार करणारे डॉ. शेट्टी म्हणाले की, 'स्ट्रोकनंतर लवकरच सुरेखाजींच्या प्रकृती सुधारणा होण्यास सुरुवात झाली. आता त्या लोकांना ओळखू लागल्या आहेत मात्र अजूनही त्यांना चालताना आधार लागतो. शूटिंग सुरु करायला त्यांना बराच वेळ लागले. त्याआधी त्यांना फिजिओ थेरेपी गरज आहे.
सुरेखा सीकरी यांना याआधी 2018 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. यामुळे सुरेखाजींना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यातून त्या बऱ्यादेखील झाल्या मात्र जास्त काम करु शकल्या नाही त्यामुळे त्यांनी आर्थिक परिस्थिती खालावली. रिपोर्टनुसार सुरेखा सीकरी यांचा महिन्यांचा औषधांचा खर्च 2 लाखांपेक्षा जास्त आहे. सुरेखा यांंना सपोर्टिंग अभिनेत्री म्हणून तीन वेळा नॅशनल अॅवॉर्ड जिंकला आहे. सिनेमांशिवाय त्यांनी सांझा चूल्हा, सात फेरे : सलोनी का सफर आणि बालिका वधू सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.