'बालवीर' फेम अभिनेता झाला नेपाळचा जावई! गर्लफ्रेंड आरतीसह लग्नबंधनात अडकला देव जोशी
By ऋचा वझे | Updated: February 26, 2025 09:54 IST2025-02-26T09:53:08+5:302025-02-26T09:54:10+5:30
२४ वर्षीय देव जोशी फक्त अभिनेताच नाही तर आणखी एका क्षेत्रात कार्यरत आहे, वाचून वाटेल अभिमान

'बालवीर' फेम अभिनेता झाला नेपाळचा जावई! गर्लफ्रेंड आरतीसह लग्नबंधनात अडकला देव जोशी
लहान मुलांची आवडती टीव्ही मालिका 'बालवीर'. या मालिकेतील मुख्य अभिनेता देव जोशी (Dev Joshi) घराघरात लोकप्रिय झाला होता. आता नुकतंच देव जोशी लग्नबंधनात अडकला आहे. बऱ्याच वर्षांपासून देव जिच्यासोबत रिलेशनिपमध्ये होता त्या गर्लफ्रेंड आरतीसह तो विवाहबद्ध झाला. तसंच आरती मूळची नेपाळची असून देव जोशी आता नेपाळचा जावई झाला आहे. सध्या सगळीकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देव जोशीच्या लग्नातील सुंदर क्षण
अभिनेता देव जोशीने काल २५ फेब्रुवारी रोजी आरतीसह सात जन्माची गाठ बांधली. आरती नेपाळची असल्याने देव आणि त्याचं कुटुंब नेपाळला पोहोचलं. दोघांचा लग्नसोहळा हा अतिशय ग्रँड होता. नातेवाईक आणि जवळचा मित्रपरिवार त्यांच्या लग्नाला आले होते. देवने लग्नात क्रीम रंगाची वर्क असलेली शेरवानी परिधान केली होती. डोक्यावर फेटाही होता. तर आरती लाल जोड्यात खूपच सुंदर दिसत होती. त्यांच्या लग्नातील सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
अहं त्वदस्मि मदसि त्वम् !में तुझसे और तू मुझसे, असं कॅप्शन देवने दिलं आहे. देव आपल्या कुटुंबासह वरातीत नाचत नाचत विवाहस्थळी पोहोचला होता. त्यांच्या हळद, मेहंदी, संगीत समारंभाचेही फोटो व्हायरल झाले होते. आश्रर्य म्हणजे देवने वयाच्या २४ व्या वर्षीच लग्न केलं आहे.
देव जोशी हा 'बालवीर' मधील भूमिकेमुळे लोकप्रिय झाला. शिवाय तो प्रोफेशनल पायलटही आहे. त्याने रीतसर शिक्षण घेतले आहे. त्याने २० गुजराती सिनेमांमध्येही काम केलं आहे.