परी समजून बंडू काका करणार लहान मुलीचं अपहरण? पोलिस करणार काकांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 13:01 IST2022-04-24T13:00:39+5:302022-04-24T13:01:16+5:30
Mazi tuzi reshimgath: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये बंडू काकांना परीची प्रचंड आठवण येत आहे.

परी समजून बंडू काका करणार लहान मुलीचं अपहरण? पोलिस करणार काकांना अटक
छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत यशस्वी घोडदौड करत आहेत. या मालिकेतील यश- नेहाची उत्तम केमिस्ट्री आणि परीचा अवखळपणा या मालिकेच्या लोकप्रियतेचं मूळ कारण आहे. त्यामुळे या मालिकेचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. यामध्येच आता पॅलेसमध्ये रहायला गेलेल्या परीच्या आठवणीत बंडू काका भावुक झाले आहेत. इतकंच नाही तर परी समजून ते चुकून एका दुसऱ्याच लहान मुलीला घरी पकडून घेऊन येतात.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये बंडू काकांना परीची प्रचंड आठवण येत आहे. इतकंच नाही तर परी समजून ते वेगळ्याच एका लहान मुलीला जबरदस्ती त्यांच्या घरी घेऊन येतात. परिणामी, या लहान मुलीची आई बंडू काकांविरोधात पोलिस तक्रार दाखल करते आणि पोलिस बंडू काकांना अटक करतात.
दरम्यान, बंडू काकांना अटक झाल्यानंतर काकू याविषयीची माहिती यश आणि नेहाला देतात. त्यामुळे यश आणि नेहा दोघंही पोलिस स्टेशनकडे धाव घेतात. मात्र, बंडू काकांना सोडवण्यासाठी यश यशस्वी ठरेल का? बंडू काका आणि परीची भेट होईल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना ही मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.