‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये बाप्पाचं थाटात होणार आगमन, कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीनं साजरा करणार गणेशोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 12:20 PM2022-08-30T12:20:19+5:302022-08-30T12:20:41+5:30

Thipkyanchi Rangoli : 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे. कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचा आगमन सोहळा करणार आहेत.

Bappa will arrive grandly in 'Thipkyaya Rangoli', Kanetkar family will celebrate Ganeshotsav in traditional way | ‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये बाप्पाचं थाटात होणार आगमन, कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीनं साजरा करणार गणेशोत्सव

‘ठिपक्यांची रांगोळी’मध्ये बाप्पाचं थाटात होणार आगमन, कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीनं साजरा करणार गणेशोत्सव

googlenewsNext

गणपती बाप्पाच्या आगमनाची आपण वर्षभर वाट पहात असतो. त्याच्या आगमनाने संपूर्ण आसमंत भारुन जातो. स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ( Thipkyanchi Rangoli) मालिकेत बाप्पाचं अगदी जल्लोषात स्वागत होणार आहे. कानेटकर कुटुंब पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढून बाप्पाचा आगमन सोहळा करणार आहेत. 

कानेटकर कुटुंबात प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरे केले जातात. यंदा बाप्पाच्या उत्सवासाठी पर्यावरण पुरक मूर्ती तर असणारच आहे, यासोबतच बाप्पाचा देखावाही घरातल्याच वस्तूंपासून बनवण्यात आला आहे. अप्पू, शशांक आणि कुक्की गँगने एकत्र येऊन बाप्पाच्या सजावटीसाठी वाड्याचीच प्रतिकृती तयार केली आहे आणि तेही टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर करत.

कानेटकर कुटुंबात सुग्रास नैवेद्याची रेलचेल असेलच. पण सोबतीला भजनाचा खास कार्यक्रम देखील रंगणार आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत सण साजरे करण्यात खरा आनंद दडलेला असतो. ठिपक्यांची रांगोळी ही मालिका आणि यातील प्रत्येक पात्र म्हणूनच प्रेक्षकांच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. तेव्हा यंदाचा गणेशोत्सव कानेटकर कुटुंबासोबत साजरा करुया. ठिपक्यांची रांगोळी दररोज रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.  

Web Title: Bappa will arrive grandly in 'Thipkyaya Rangoli', Kanetkar family will celebrate Ganeshotsav in traditional way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.