बनेंच्या घरी जल्लोषात झाले बाप्पाचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 12:35 PM2018-09-14T12:35:40+5:302018-09-14T12:41:00+5:30

बाप्पाच्या आगमनाने हमं बने तुमं बने या बने कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यामुळे घरात सगळीकडे आनंद आणि उत्साह संचारलेला पाहायला मिळतो आहे.

Bappa's arrival came to Bane's house | बनेंच्या घरी जल्लोषात झाले बाप्पाचे आगमन

बनेंच्या घरी जल्लोषात झाले बाप्पाचे आगमन

googlenewsNext
ठळक मुद्देतीन-तीन स्त्रियांच्या भिन्न दृष्टीकोनवर आधारित 'ह.म.बने तु.म.बने' मालिकाबनेंच्या घरी दीड दिवसांसाठी गणपती झालेत विराजमानबनेंच्या घरी केलीय इकोफ्रेंडली सजावट

गणपती बाप्पा... लहान असो किंवा मोठे... हा सगळ्यांचाच लाडका... याच्या येण्याने घरात आनंदी आनंद पसरतो... हा आनंद संपूर्ण महाराष्ट्र सध्या अनुभवतो आहे... याच आनंदात यावर्षी सोनी मराठीचा बने परिवार ही सामील झाला आहे. खास बच्चे कंपनीच्या आग्रहाखातर यंदा बने परिवाराने दीड दिवस गणेशाची स्थापना केली आहे.


बाप्पाच्या आगमनाने हमं बने तुमं बने या बने कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे. त्यामुळे घरात सगळीकडे आनंद आणि उत्साह संचारलेला पाहायला मिळतो आहे. कुटुंब एकदम आनंदी आहे आणि गंमत म्हणजे घरात मखर बनवण्याची स्पर्धा सुद्धा रंगली आहे. बाप्पाची आरास करण्यात ही बने परिवाराने कसर सोडली नाही आहे. त्यांनी इकोफ्रेंडली सजावट केली आहे. इकोफ्रेंडली सजावट करून बने कुटुंबियांनी छान संदेश दिला आहे. अगदी निरागसतेने ही सजावट केली गेली आहे. रंगीबेरंगी साज आणि आरास यात बाप्पा विराजमान झाले आहेत. सगळीकडे आनंद असताना बच्चे कंपनीच्या मनात मात्र बाप्पा आपल्या घरी दिडच दिवस असणार याची खंत आहे. आता नाराज बच्चे कंपनीची समजूत मोठे कसे काढणार आणि कशा पद्धतीने हा उत्सव बनेंच्या घरी साजरा केला जाणार हे पाहण्यासाठी मालिका नक्कीच पाहावी लागेल. 
सोनी मराठीने 'ह.म.बने तु.म.बने' या मालिकेद्वारे एक नाही, दोन नाही तर तीन-तीन स्त्रियांच्या भिन्न दृष्टीकोनवर आधारित तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातले नाट्य हलक्या फुलक्या नर्मविनोदी शैलीत मांडले आहे. या मालिकेला सोशल मीडियावर आलेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून लक्षात येते.

Web Title: Bappa's arrival came to Bane's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.