बरखा बिष्ट नामकरण ही मालिका सोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 05:44 PM2017-01-05T17:44:47+5:302017-01-05T17:44:47+5:30
नामकरण या मालिकेत बरखा बिष्ट प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती 10 वर्षांच्या अवनीची आई असल्याचे प्रेक्षकांना पाहायला ...
न मकरण या मालिकेत बरखा बिष्ट प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत ती 10 वर्षांच्या अवनीची आई असल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळते. या मालिकेला सुरू होऊन काहीच महिने झाले असले तरी या मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळालेली आहे. या मालिकेतील आशा ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांना खूप आवडते. ही व्यक्तिरेखा बरखा बिष्टने खूप चांगल्याप्रकारे साकारली आहे. पण आता या मालिकेत आशाचा मृत्यू झाल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लवकरच प्रेक्षकांची लाडकी बरखा प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
आशा दुसऱ्या मुलीला जन्म देताना कोमात जाते आणि त्यातच तिचे निधन होते असे दाखवण्यात येणार आहे. याविषयी बरखा सांगते, "कथेच्या मागणीनुसार मला या मालिकेतून बाहेर पडावे लागणार आहे. या मालिकेतील माझी भूमिका मला खूपच आवडली होती. ही मालिका सोडण्याचे मला नक्कीच दुःख होत आहे. पण कथा पुढे जाण्यासाठी माझ्या व्यक्तिरेखेचे निधन दाखवणे हे अत्यंत गरजेचे होते. खरे तर प्रेक्षक मालिकांच्या व्यक्तिरेखासोबत जोडलेले असतात आणि त्यातही प्रेक्षकांना ट्रॅजिक गोष्टी अधिक आवडतात. त्याचमुळे नायिकेचे निधन झाल्याचे दाखवल्यावर प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसेल असे टीमचे म्हणणे आहे. प्रेक्षकांना एक जोरदार धक्का देणे हेच आशाचे निधन दाखवण्यामागचे एक मुख्य कारण आहे. आशाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तिरेखेचे निधन दाखवल्यास प्रेक्षकांना तितकासा फरक पडला नसता त्यामुळे आशा या व्यक्तिरेखेला निरोप देण्याचे ठरवण्यात आले आहे. या मालिकेमुळे मला महेश भट्ट यांच्यासोबत काम करायला मिळाले यामुळे मी प्रचंड खूश आहे."