कसौटी जिंदगी की या मालिकेच्या रिमेकमध्ये हा अभिनेता दिसणार मि. बजाजच्या भूमिकेत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 04:23 PM2018-07-28T16:23:07+5:302018-07-30T06:00:00+5:30
श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका या नव्या मालिकेत एरिका फर्नांडिस साकारणार असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन झळकणार आहे तर कोमिलाकाच्या भूमिकेत ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान दिसणार असल्याची चर्चा आहे. कसौटी जिंदगी की मध्ये प्रेरणा, अनुराग, कोमालिका या व्यक्तिरेखांसोबतच मि. बजाज ही भूमिका तितकीच महत्त्वाची होती.
‘कसौटी जिंदगी की’ हा एकेकाळी गाजलेला शो पुन्हा एकदा परतणार आहे. एकता कपूर ही मालिका नव्या रूपात प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय. साहजिकच या शोच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘कसौटी जिंदगी की2’ चा प्रोमो व्हिडिओ रिलीज होताच, चाहत्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. एकता कपूरने नुकताच ‘कसौटी जिंदगी की2’चा प्रोमो रिलीज केला. ‘पुन्हा एकदा एक शानदार प्रेम कहाणी घेऊन येतेय. मी प्रचंड उत्साहित आहे,’ असे तिने लिहिले. हा प्रोमो रिलीज झाला आणि सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. केवळ इतकेच नाही तर चाहत्यांचा आनंद जणू गगणात मावेनासा झाला.
श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका या नव्या मालिकेत एरिका फर्नांडिस साकारणार असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन झळकणार आहे तर कोमिलाकाच्या भूमिकेत ये रिश्ता क्या कहलाता है फेम हिना खान दिसणार असल्याची चर्चा आहे. कसौटी जिंदगी की मध्ये प्रेरणा, अनुराग, कोमालिका या व्यक्तिरेखांसोबतच मि. बजाज ही भूमिका तितकीच महत्त्वाची होती. मि. बजाज ही भूमिका रोनित रॉयने साकारली होती. या मालिकेद्वारे त्याने अनेक वर्षांनी अभिनयक्षेत्रात कमबॅक केला होता. त्याची ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या मालिकेमुळेच रोनित रॉय हे नाव घराघरात पोहोचले. या मालिकेच्या या नव्या रूपात मि. बजाज या भूमिकेत कोण असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. ही भूमिका बरुण सोबती साकारणार अशी चर्चा आहे. बरुण सोबतीने इस प्यार को क्या नाम दूँ, दिल मिल गये यांसारख्या अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
‘कसौटी जिंदगी की’मध्ये अभिनेत्री श्वेता तिवारी हिने प्रेरणाची भूमिका साकारली होती तर सिजेन खान अनुरागच्या भूमिकेत दिसला होता. या दोन्ही भूमिका चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या होत्या. २००१ मध्ये आलेली ही मालिका तब्बल ९ वर्षं सुरू होती. या मालिकेचे हे नवे रूप देखील प्रेक्षकांना तितकेच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.