'बीचवाले'च्या आगामी भाग कॉस्मेटिक सर्जरीच्या समस्येवर करणार भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 19:37 IST2018-12-12T19:36:44+5:302018-12-12T19:37:48+5:30
सोनी सब वाहिनीवरील हलकाफुलका विनोदी कार्यक्रम 'बीचवालेः बापू देख रहा है'ने आपल्या प्रेक्षकांना त्यातील सुसंगत विषयाद्वारे खिळवून ठेवले आहे.

'बीचवाले'च्या आगामी भाग कॉस्मेटिक सर्जरीच्या समस्येवर करणार भाष्य
सोनी सब वाहिनीवरील हलकाफुलका विनोदी कार्यक्रम 'बीचवालेः बापू देख रहा है'ने आपल्या प्रेक्षकांना त्यातील सुसंगत विषयाद्वारे खिळवून ठेवले आहे. याच्या आगामी भागात कॉस्मेटिक सर्जरीच्या समस्येवर प्रकाशझोत टाकला जाणार आहे. यात चंचल (अनन्या खरे)च्या ओठांवर शस्त्रक्रिया केल्याने दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत.
चंचलला आपल्याकडे बॉबी (झाकिर हुसेन) लक्ष देत नसल्याचे वाटत असल्यामुळे ती आकर्षक दिसण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या लढवते. ती मालिकेत प्रथमच पाश्चिमात्य कपडे घालते. सर्वतोपरी प्रयत्न केल्यावरही तिला बॉबीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्याच्या दुर्लक्षामुळे नाराज झालेली ती ओठ मोठे करण्याचे उपचार घेण्याचा रूबीचा सल्ला ऐकते. पण शीतल (अंकिता शर्मा)ने तिला त्याच्या संभाव्य दुष्परिणामांची माहिती दिलेली असते. अर्थात प्रक्रिया झाल्यावर चंचल सुरूवातीला आपल्या नवीन लुकमुळे खूश असते परंतु त्या रात्री तिचे ओठ सुजतात आणि मग ती निराश होते. आपल्या दिसण्याची लाज वाटत असल्यामुळे चंचल आता खूप नाराज झाली आहे. बॉबी याला कसा प्रतिसाद देईल? तो चंचलकडे लक्ष देऊन तिला शांत करेल आणि या परिस्थितीतून बाहेर यायला मदत करेल का? हे मालिका पाहिल्यावर समजेल.
चंचलच्या भूमिकेतील अनन्या खरे म्हणाली की, ‘‘बीचवाले हा एक अशी मालिका आहे‚ ज्यातून सामान्य नागरिकांच्या आयुष्यातील रोजच्या समस्यांवर भर दिला जातो. हा शो अत्यंत गंभीर संदेशही विनोदी ढंगाने देतो आणि प्रेक्षकांना भरपूर हसवतो हे पाहणे खूप आनंददायी आहे. यातील सर्व कलाकार अत्यंत प्रतिभावान आहेत आणि आम्ही सेटवर कायम मजा करतो.’’