Bigg Boss 17 फिनालेपूर्वी विकी जैनने शेअर केला सुंदर फोटो, अंकितासाठी लिहिली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 04:55 PM2024-01-28T16:55:45+5:302024-01-28T16:57:01+5:30
विकीने इन्स्टाग्रामवर पत्नी अंकिता लोखंडेसोबतचा खूपच क्युट फोटो शेअर केला आहे.
बिग बॉस 17 (Bigg Boss 17) च्या या सिझनमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokahnde) आणि विकी जैन (Vicky Jain) ही जोडी चांगलीच चर्चेत राहिली. संपूर्ण सिझनमध्ये त्यांची भांडणं अक्षरश: चव्हाट्यावर आली. फिनाले च्या काही दिवस आधीच विकी जैन बाहेर पडला. त्याला टॉप 5 स्पर्धकांमध्ये जागा मिळवता आली नाही. आता तो आपल्या पत्नीला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला आहे. आज बिग बॉसचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. त्याआधी विकीने काही वेळापूर्वीच अंकितासोबतचा सुंदर फोटो शेअर करत तिच्यासाठी काही ओळी लिहिल्या आहेत.
विकीने इन्स्टाग्रामवर पत्नी अंकिता लोखंडेसोबतचा खूपच क्युट फोटो शेअर केला आहे. दोघंही एकमेकांशी दिलखुलासपणे गप्पा मारत असताना फोटो कॅप्चर करण्यात आला आहे. या फोटोसोबत विकीने कॅप्शनमध्ये लिहिले, "आयुष्यातील प्रत्येक चढउतारांचा आपण एकमेकांसोबत राहून सामना केला. तुझा आनंदी स्वभाव नेहमीच प्रेरणा देणारा आहे. आपल्या मार्गात जे काही येईल ते तू अतिशय चातुर्याने निभावशील यात मला जराही शंका नाही. मी तुझ्यासोबत आहे"
विकी जैनच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे काही जणांनी त्यांना ट्रोलही केले आहे. अनेकांना अंकिताचं घरातील वागणं खटकलं आहे तर विकी जैनला मात्र सर्वांचा पाठिंबा राहिला आहे. 'आता ही नौटंकी करुन उपयोग नाही' अशा शब्दात दोघांना ट्रोल करण्यात येत आहे.अंकिता आणि तिची सासू यांच्यात झालेला वाद चर्चेत. मात्र सध्या अंकिताचं लक्ष बिग बॉसच्या ट्रॉफीकडे असणार आहे. संध्याकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत महाअंतिम सोहळा रंगणार आहे. तर १२ वाजता होस्ट सलमान खान विजेत्याची घोषणा करणार आहे.