"मन हेलावून टाकणारे...", संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:03 IST2025-03-04T12:02:35+5:302025-03-04T12:03:01+5:30
Santosh Deshmukh Murder Case : मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांची अशापद्धतीने अमानवी कृत्य करून हत्या केल्यानंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता पृथ्विक प्रतापने संताप व्यक्त केला आहे.

"मन हेलावून टाकणारे...", संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने गेले कित्येक दिवस राज्यात वादंग सुरू आहे. अशातच काल संतोष देशमुख यांच्या हत्येचे मन हेलावून टाकणारे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी केलेली कृत्य समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या गुन्हेगारांबद्दल सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत.
मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांची अशापद्धतीने अमानवी कृत्य करून हत्या केल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्विक प्रतापने संताप व्यक्त केला आहे. संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पृथ्विक प्रतापने संतप्त पोस्ट शेअर केली आहे. "मन सुन्न करणारे, मन हेलावून टाकणारे संतापजनक फोटो...संतोष देशमुख यांना न्याय मिळायलाच हवा", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. याप्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.