झरीना वहाब सांगतायेत हा ठरला माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 06:15 AM2018-06-20T06:15:08+5:302018-06-20T11:45:08+5:30
जिंदगी के क्रॉसरोड्स या सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात जीवन बदलून टाकणाऱ्या अनेक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हा शो ...
ज ंदगी के क्रॉसरोड्स या सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवरील कार्यक्रमात जीवन बदलून टाकणाऱ्या अनेक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हा शो अंतर्दृष्टीचा आणि भावनात्मकतेचा रोलर कोस्टर असेल असे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक राम कपूर सांगतो. हा शो शबिना खान निर्मित आणि महादेव यांनी लिहिलेला आहे. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागामध्ये एक नवीन कथा सादर होणार असून कथांना सामोरा जाणारा क्रॉसरोड्स स्टुडिओमधील प्रेक्षकांसाठी एका अद्वितीय मंचावर चर्चेसाठी खुला राहील.
'आई' या विषयावरील कथेत अभिनेत्री झरीना वहाब आपल्या मुलाच्या आनंदासाठी सर्व काही करणाऱ्या आईची भूमिका साकारत आहेत. ही कथा एका आईबद्दल आहे, या आईला आपल्या सुनेचे खरे रूप कळते. आपल्या मुलाच्या आनंदासाठी ती सत्य लपवेल का? यावर चर्चा या कार्यक्रमात रंगणार आहे. ही भावनिक कथा आहे. या विषयी झरीना वहाब सागंतात, "मी आजवर अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्यात आईच्या भूमिका या अधिक आहेत. पण मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूप वेगळी असल्याने मी ती भूमिका स्वीकारली. मी स्वत: एक आई आहे आणि माझ्या मुलांना आनंद मिळावा यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत असते. माझे माझ्या मुलांसोबतचे नाते खूपच चांगले आहे. शबिना खान (शो च्या प्रोड्यूसर) खूपच गोड मुलगी आहे आणि मी तिला दोन तीन वेळा भेटले आहे. जेव्हा मी तिच्याकडून शोची संकल्पना जाणून घेतली तेव्हा मला आश्चर्य वाटले होते की जिंदगी के क्रॉस रोडससारखी एक अद्वितीय संकल्पना टेलिव्हिजनवर सादर करण्यात येत आहे. मला खात्री आहे की हा कार्यक्रम प्रेक्षकांना आवडेल."
झरीना स्वतःच्या जीवनातील क्रॉसरोड्सबद्दल बोलताना सांगतात, "माझी आई माझ्या आदित्य (पंचोली) बरोबरच्या लग्नाबद्दल उत्सुक नव्हती. पण मी त्याच्यावर प्रेम केले आणि मला त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. हा जीवनाचा सर्वात मोठा क्रॉसरॉड होता आणि आता माझ्या हे लक्षात आले की मी सर्वोत्तम निर्णय घेतला आहे.
Also Read : राम कपूरने त्याच्या वजनाबाबत घेतला हा निर्णय