'भाभी जी घर पर हैं'मधील अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; 19 वर्षीय मुलाचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 01:34 PM2022-09-28T13:34:32+5:302022-09-28T13:35:05+5:30

कॉमेडियन सुनील पाल यांनी आयुषच्या अकाली निधनावर दुःखद व्यक्त केले.

Bhabhi ji ghar par hai actor jeetu guptas son ayush died at the age of 19 | 'भाभी जी घर पर हैं'मधील अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; 19 वर्षीय मुलाचे निधन

'भाभी जी घर पर हैं'मधील अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; 19 वर्षीय मुलाचे निधन

googlenewsNext

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'भाभी जी घर पर हैं' मधील अभिनेता जितू गुप्ता यांच्या मुलाचे निधन झाले आहे. जीतू गुप्ता यांच्या मुलाचे नाव आयुष असून तो केवळ 19 वर्षांचा होता. आपल्या तरुण मुलाच्या निधनामुळे जीतू यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

जीतू गुप्ता यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर आयुषचा फोटो शेअर करून त्याच्या मृत्यूची बातमी चाहत्यांना दिली. यानंतर कॉमेडियन सुनील पाल यांनी जीतू गुप्तांच्या मुलाच्या निधनावर दुःखद व्यक्त केले. सुनील पाल यांनी पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले – 'RIP, भाभी जी घर पर हैमधील अभिनेता, माझा भाऊ जीतूचा मुलगा आयुष (19 वर्ष) राहिला नाही.'

जीतू गुप्तांनी एक दिवसापूर्वी आपल्या मुलाचा हॉस्पिटलमधील फोटो शेअर करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. फोटोमध्ये आयुष हॉस्पिटलच्या बेडवर दिसत होता. आयुषचा हा फोटो शेअर करताना जीतूने सांगितले होते की, त्यांच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे आणि तो कोणाशीही बोलण्याच्या स्थितीत नाही. आयुषबद्दलची पोस्ट वाचून, तुम्हा सर्वांचे त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सतत फोन येत आहेत. तुम्ही सर्व जण देवाकडे प्रार्थना करा.'

कोण होते जीतू गुप्ता?
जीतू गुप्ता 'भाभी जी घर पर हैं' या मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारायचे. या शोमधून त्यांना विशेष ओळख आणि नाव मिळाले. 'भाभी जी घर पर हैं' ही मालिका त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट असल्याचे त्यांनी स्वतः एका मुलाखतींमध्ये सांगितले आहे. 

Web Title: Bhabhi ji ghar par hai actor jeetu guptas son ayush died at the age of 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.