'अंगूरी भाभी'चं शाळेत जडलं होतं प्रेम, पतीने शुभांगीसाठी सोडली नोकरी, मग का मोडला 19 वर्षांचा संसार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 03:04 PM2023-04-12T15:04:47+5:302023-04-12T15:10:04+5:30
'अंगूरी भाभी' म्हणजेच टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'भाभी जी घर पर हैं' मधील शुभांगी अत्रे गेल्या वर्षी पती पीयूष पुरीपासून विभक्त झाली आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत 'भाभी जी घर पर हैं' या मालिकेचं नक्कीच आहे. या कार्यक्रमातील सर्व पात्र प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. विशेषत: 'अंगूरी भाभी'ची व्यक्तिरेखा नेहमीच लोकांना आवडली आहे. या व्यक्तिरेखेमध्ये शुभांगी अत्रेने सर्वांना प्रभावित केले आणि तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. परंतु गेल्या वर्षी तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही चढ-उतारा आलेत आणि त्यामुळे अभिनेत्री खूप चिंतेत होती.
'भाभी जी घर पर है'ने शुभांगीला घराघरात ओळख मिळवून दिली आहे. किंवा इतकंच म्हणा की या शोने त्याच्या करिअरला पुन्हा एकदा भरारी दिली आहे. शुभांगी प्रसिद्धीच्या झोतात आली जेव्हा तिनं 19 वर्षांचा संसार मोडला.पती पीयूष पुरी यांच्यापासून ती विभक्त झाली होती, ज्यांच्याशी तिने 2003 मध्ये लग्न केले होते.
१९ व्या वर्षी केलं लग्न
शुभांगी आणि पियुषचे विभक्त होणे अनेकांसाठी धक्कादायक होते कारण दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. दोघांचे नातं काही वर्षांचे नाही तर शाळेपासून होते. शाळेच्या दिवसांपासून दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न केले. लग्नाच्या वेळी शुभांगीचे वय अवघे १९ वर्षे होते. त्यांना एक मुलगी आशी आहे. मुलगी दोन वर्षांची असताना शुभांगीने अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.
अभिनयाच्या दुनियेत स्थान निर्माण करण्यासाठी शुभांगीला अनेकदा ऑडिशनसाठी जावे लागले. अशा परिस्थितीत घरात मुलीची काळजी घेण्यात अडचण आली. शुभांगीचे पती पियुष त्यावेळी एका जाहिरात कंपनीत काम करायचे, पण पत्नीच्या स्वप्नांसाठी त्यांनी नोकरी सोडली आणि मुलाचा संभाळ केला. शुभांगीचे करिअर मार्गी लागल्यावर पियुष पुन्हा नोकरीत रुजू झाला. सर्व काही ठीक चालले होते पण नंतर नात्यात कटुता येऊ लागली. बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शुभांगीने सांगितले की, दोघांमध्ये काही वैयक्तिक समस्या होत्या, ज्या सुधारण्याचा खूप प्रयत्न केला, पण यात काही यश मिळालं नाही तेव्हा त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.