'भाबीजी घर पर है' फेम अभिनेता सेटवर झाला बेशुद्ध, रुग्णालयात केलं दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 10:04 IST2025-03-25T10:03:44+5:302025-03-25T10:04:12+5:30

Aasif Shaikh Health Update: देहरादूनमध्ये शूटिंगदरम्यान आसिफ शेख अचानक आजारी पडला आणि बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

'Bhabhiji Ghar Par Hai' fame actor Aasif Shaikh faints on set, admitted to hospital | 'भाबीजी घर पर है' फेम अभिनेता सेटवर झाला बेशुद्ध, रुग्णालयात केलं दाखल

'भाबीजी घर पर है' फेम अभिनेता सेटवर झाला बेशुद्ध, रुग्णालयात केलं दाखल

हिंदी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाबीजी घर पर है' (Bhabiji Ghar Par Hai) मध्ये विभूती नारायणची भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ शेख (Aasif Shaikh) शूटिंगदरम्यान अचानक आजारी पडला. देहरादूनमध्ये ॲक्शन सीन शूट करत असताना तो अचानक बेशुद्ध पडला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

देहरादूनमध्ये शूटिंगदरम्यान आसिफ शेख अचानक आजारी पडला आणि बेशुद्ध पडला. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, आसिफ शेखला तातडीने घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्याला चांगल्या उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले. सध्या आसिफ शेख यांचे कुटुंबीय आणि 'भाबी जी घर पर हैं'च्या निर्मात्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

विभूती नारायणच्या भूमिकेतून मिळाली लोकप्रियता

'भाबीजी घर पर हैं' या मालिकेचे प्रचंड चाहते आहेत. मालिकेच्या यशात आसिफ शेखचा महत्त्वाचा वाटा आहे. या मालिकेत अभिनेत्यासोबत रोहिताश्व गौर, शुभांगी अत्रे, विदिशा श्रीवास्तव आणि इतर कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आजही त्यांना विभूती नारायणच्या भूमिकेमुळे लोकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

आसिफ शेखने बॉलिवूडमध्येही केलंय काम
टेलिव्हिजन व्यतिरिक्त, आसिफ शेखने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. त्याने 'येस बॉस', 'करण अर्जुन', 'जोडी नंबर १', 'पहेली', 'भारत' आणि 'किसी का भाई किसी की जान' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'भाबी जी घर पर हैं'मध्ये त्याने ३०० हून अधिक वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा विक्रम केला आहे. चाहते आणि जवळचे लोक त्याला लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत.

Web Title: 'Bhabhiji Ghar Par Hai' fame actor Aasif Shaikh faints on set, admitted to hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.