अंगूरी भाभीला करायचंय ओटीटीवर काम, शुभांगी अत्रे म्हणाली- "मी बोल्ड सीन करायला तयार, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 12:54 PM2024-06-25T12:54:51+5:302024-06-25T12:55:57+5:30

शुभांगीने नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ओटीटीवर काम करण्याची इच्छा व्यक्त करत बोल्ड सीन्स करण्यासाठी तयार असल्याचंही सांगितलं.

bhabhiji ghar par hai fame actress shubhangi atre aka anguri bhabhi said she is ready to do bold scenes | अंगूरी भाभीला करायचंय ओटीटीवर काम, शुभांगी अत्रे म्हणाली- "मी बोल्ड सीन करायला तयार, पण..."

अंगूरी भाभीला करायचंय ओटीटीवर काम, शुभांगी अत्रे म्हणाली- "मी बोल्ड सीन करायला तयार, पण..."

'भाभीजी घर पर है' या लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री शुभांगी अत्रे घराघरात पोहोचली. या मालिकेतील अंगुरी भाभी या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 'चिड़िया घर', 'हवन', 'कस्तुरी', 'कसौटी जिंदगी की' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलेल्या शुभांगी अत्रे हिला भाभीजी घर पर है मालिकेने प्रसिद्धीझोतात आणलं. मालिकाविश्व गाजवल्यानंतर आता शुभांगीला ओटीटीवर काम करायचं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ओटीटीवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

शुभांगीने नुकतीच नवभारत टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ओटीटीवर काम करण्याची इच्छा व्यक्त करत बोल्ड सीन्स करण्यासाठी तयार असल्याचंही सांगितलं. शुभांगी म्हणाली, "मला ओटीटीवर असं काहीतरी करायचं आहे. जे मी यापूर्वी केलेलं नाही. मला अशी भूमिका साकारायची आहे ज्यात वेगळेपण असेल. आणि ती भूमिका पाहून प्रेक्षकही अचंबित होतील". या मुलाखतीत तिने ओटीटीवरील बोल्ड कटेंटबद्दलही भाष्य केलं. 

"मला बोल्ड सीन्स करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पण, ते सौंदर्याच्या दृष्टीने आकर्षित असले पाहिजेत. ते अश्लील दिसावे, असं मला वाटत नाही. मी बोल्डनेससाठीही तयार आहे. पण, ते चांगले वाटले पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे कथेची गरज असली पाहिजे. जर ते कलात्मक पद्धतीने शूट करण्यात येणार असतील, तर मला काहीच प्रॉब्लेम नाही," असंही शुभांगीने सांगितलं. 
 

Web Title: bhabhiji ghar par hai fame actress shubhangi atre aka anguri bhabhi said she is ready to do bold scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.