मुलगी झाली हो...! 'भाबीजी घर पर है' फेम विदिशा श्रीवास्तव झाली आई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 04:19 PM2023-07-15T16:19:33+5:302023-07-15T17:19:12+5:30

सध्या अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

Bhabhiji ghar par hai fame vidisha srivastava becomes a mom she gives birth to a baby girl | मुलगी झाली हो...! 'भाबीजी घर पर है' फेम विदिशा श्रीवास्तव झाली आई

मुलगी झाली हो...! 'भाबीजी घर पर है' फेम विदिशा श्रीवास्तव झाली आई

googlenewsNext

भाभीजी घर पर हैं या गाजलेल्या मालिकेतील गोरी मैम म्हणजेच अभिनेत्री विदिशा श्रीवास्तवने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ११ जुलैला विदिशाच्या घरी नन्ही परीचं आगमन झालं आहे. सध्या विदिशा आपलं मदरहुड एन्जॉय करते आहे.  आई व तिच्या चिमुकलीची प्रकृती उत्तम असल्याचं कळतंय. सध्या अभिनेत्रीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.

9 जून 2023 रोजी विदिशा श्रीवास्तवने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली. अभिनेत्रीचे बोल्ड मॅटर्निटी शूट चर्चेचा विषय ठरले होते.  लाल रंगाच्या साडीपासून ते पांढऱ्या रंगाच्या ड्रेसपर्यंत तिचे फोटो शूट गाजलं होतं. डिलीव्हरीच्या  दोन आठवडे आधी तिने शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. यानंतरही काही महिने ती घरीच आपल्या मुलीसोबत असणार आहे. ती आपल्या मुलीचं नाव आद्या ठेवणार असल्याचं एका मुलाखतीत तिने सांगितलं. 

 विदिशा श्रीवास्तवने साऊथमधून आपल्या करिअरची सुरुवात केली.  'ये है मोहब्बतें' या मालिकेद्वारे टीव्ही पडद्यावर पाऊल ठेवण्यापूर्वी तिने अनेक तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्यानंतर, ती 'कहट हनुमान जय श्री राम' सारख्या इतर असंख्य टेलिव्हिजन मालिकांचा भाग होती. 'भाभीजी घर पर हैं' तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. 

 विदिशाने सायक पॉलसोबत  गुपचूप लग्न केलं होतं. विशेष म्हणजे विदिशाने जवळपास ४ वर्ष ही गोष्ट लपवून ठेवली. अलिकडेच तिच्या लग्नाचं सत्य समोर आलं आहे. भाभाजी घर पर हैं या मालिकेत आतापर्यंत तीन अभिनेत्रींनी अनिता भाभीची भूमिका केली आहे. यात पहिले सौम्या टंडन, नेहा पेंडसे आणि आता विदिशा श्रीवास्तव या अभिनेत्रींचा समावेश आहे.

Web Title: Bhabhiji ghar par hai fame vidisha srivastava becomes a mom she gives birth to a baby girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.