Bhabi Ji Ghar Par Hai : जाता जाता हसवून गेला मलखान...; व्हायरल होतोय दीपेश भानचा अखेरचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 11:59 AM2022-07-24T11:59:59+5:302022-07-24T12:02:51+5:30
Bhabi Ji Ghar Par Hai Deepesh Bhan died : दीपेशच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. याचदरम्यान दीपेशची अखेरची पोस्ट व्हायरल होतेय.
टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय मालिका ‘भाभीजी घर पर है’ (Bhabi Ji Ghar Par Hai) या मालिकेत आपल्या अभिनयाने सर्वांना हसवणारा अभिनेता दीपेश भान (Deepesh Bhan) याने काल अचानक जगातून एक्झिट घेतली. वयाच्या उण्यापुऱ्या 41 व्या वर्षी त्याचं निधन झालं. शनिवारी सकाळी क्रिकेट खेळत असताना अचानक तो जमिनीवर कोसळला. बराच वेळ शुद्धीवर न आल्याने त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दीपेशच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. टीव्ही इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. याचदरम्यान दीपेशची अखेरची पोस्ट व्हायरल होतेय.
‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत मलखानची भूमिका साकारून दीपेश घराघरात पोहोचला होता. त्याच्या कॉमेडीचे लोक फॅन होते. केवळ शोमध्येच नाही तर सोशल मीडयावर तो मजेशीर व्हिडीओ शेअर करायचा. त्याची अखेरची पोस्टही अशीच मजेशीर आहे. अखेरच्या पोस्टमध्येही त्याने चाहत्यांना खळखळून हसवलं आहे.
मृत्यूच्या तीन दिवस आधी त्याने ही पोस्ट शेअर केली होती. यात तो लिपसिंक करताना दिसणार आहे. ‘दो औरतें अगर खुसरपुसर कर रही है तो ये समझ जाइए डाटा ट्रान्सफर हो रहा है और जब ये बोल दें की हटाओ बहन हमको क्या लेना है. तो समझ जाइए डाटा सेव हो गया है और व्हायरल होने के लिए तैयार है’, असं तो या व्हिडीओत म्हणतोय. मलखानने क्या ज्ञान दे दिया.., असं त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
जाता जाता दीपेशने लोकांना हसवलं. त्याचा हा व्हिडीओ बघून चाहते भावुक झाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करणारा मलखान आज आपल्यात नाही, यावर लोकांचा अजूनही विश्वास बसत नाहीये.
दीपेश गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीत सक्रीय होता. त्याने आतापर्यत अनेक मालिकांमध्ये सहाय्यक विनोदी भूमिका साकारल्या होत्या. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतसुद्धा त्याने काम केलं होत. मात्र त्याला खरी ओळख ‘भाभीजी घरपर है’ या मालिकेमुळे मिळाली होती. या मालिकेती मलखान हे पात्र घराघरात प्रसिद्ध झालं होतं.