Bhagya Lakshmi फेम अभिनेत्री Maera Mishraची अचानक बिघडली तब्येत, हॉस्पिटलमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 01:36 PM2022-11-01T13:36:56+5:302022-11-01T13:43:57+5:30

Bhagya Lakshmi फेम अभिनेत्री मायरा मिश्रा हिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. चाहते ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Bhagya lakshmi fame actress Maera Mishra rushed hospital critical condition after dengue | Bhagya Lakshmi फेम अभिनेत्री Maera Mishraची अचानक बिघडली तब्येत, हॉस्पिटलमध्ये दाखल

Bhagya Lakshmi फेम अभिनेत्री Maera Mishraची अचानक बिघडली तब्येत, हॉस्पिटलमध्ये दाखल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'भाग्य लक्ष्मी'(Bhagya Lakshmi)मध्ये दिसणारी अभिनेत्री मायरा मिश्रा(Maera Mishra) बाबत नुकतीच  बातमी समोर आली आहे. मीराची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिला डेंग्यू झाल्याचं निदान झालं होतं, त्यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. ही बातमी समोर आल्यानंतर टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित सेलिब्रिटी आणि मीराच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रत्येकाला तिची हेल्थ अपडेट्सबद्दल जाणून घ्यायचे आहे.

मायरा मिश्रा 'भाग्य लक्ष्मी' या टीव्ही शोमध्ये मलिष्का बेदीची भूमिका साकारत आहे. असे सांगितले जात आहे की अभिनेत्रीला यापूर्वी डेंग्यूचं निदान झालं होतं आणि तिच्यावर घरी उपचार सुरू होते पण तिची प्रकृती खालावत होती. आज तिची प्रकृती अचानक बिघडल्यानं तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. दिवाळीच्या दोन दिवस आधीपासून अभिनेत्रीला ताप आला होता आणि या अवस्थेतही ती शूटिंग करत होती.

 मायराला हा फक्त सधा ताप वाटत होता आणि ती दिवाळी आपल्या कुटुंबासोबत साजरी करण्यासाठी बरेलीला पोहोचली. तिने तिच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही आणि ती आजारी पडली. यानंतर कुटुंबीयांनी तिला डॉक्टरांनाकडे नेलं. डॉक्टरांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, जिथे तिला डेंग्यूचं निदान झालं. अभिनेत्रीचे हेल्थ अपडेट अद्याप समोर आलेले नाही. मायराचे चाहते ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

Web Title: Bhagya lakshmi fame actress Maera Mishra rushed hospital critical condition after dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.