'बिग बॉस १२ 'मध्ये भजनसम्राट अनूप जलोटा यांची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 06:59 PM2018-09-11T18:59:31+5:302018-09-11T19:04:12+5:30

विनोदवीर भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांची 'बिग बॉस'च्या बाराव्या सीझनसाठी निवड झाल्यानंतर आता प्रसिद्ध भजनसम्राट अनूप जलोटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते आहे.

Bhajan Samrat Anup Jalota's entry in Bigg Boss 12 | 'बिग बॉस १२ 'मध्ये भजनसम्राट अनूप जलोटा यांची एन्ट्री

'बिग बॉस १२ 'मध्ये भजनसम्राट अनूप जलोटा यांची एन्ट्री

googlenewsNext
ठळक मुद्देबिग बॉसच्या घरातील सदस्यांना अनूप जलोटा ऐकवणार भजनमला आव्हाने स्वीकारायला आवडतात - अनूप जलोटा


'बिग बॉस'च्या बाराव्या सीझनची नुकतीच घोषणा करण्यात आली. या सीझनमध्ये भारती सिंग व हर्ष लिंबाचिया यांच्यानंतर अनूप जलोटा 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करणार आहेत. त्यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अनूप जलोटा म्हणाले की हो मी 'बिग बॉस' सीझन १२ च्या घरात जातो आहे. मला माहित आहे की माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीसाठी हा खूप कठीण निर्णय आहे. पण मला कठीण काम करायला फार आवडते.

अनूप जलोटा यांनी सांगितले की, ''बिग बॉस'च्या घरात जाण्याचे निमंत्रण आल्यानंतर मी तिथे जाऊन काय करणार असा प्रश्न माझ्या मनात आला. त्यानंतर विचार केला की जर लोकांसोबत संगीतासोबत प्रेमाच्या गोष्टी केल्या तर घरातील समस्या दूर करता येतील. मी मस्तीतदेखील सामील होईन. त्यांना भजन ऐकवून त्यांना खूश करेन.'
बिग बॉसच्या घरात जाण्याच्या निर्णयाबाबत बोलताना अनूप म्हणाले की, 'काम कठीण केले पाहिजे. त्यामुळेच मी बिग बॉसच्या घरात जायला तयार झालो. जर चित्रपटातील गाणी गायली असती तर सहज यश मिळवले असते. पण, मी भजन निवडले. भजन क्षेत्रात करियर करणे सोप्पे नव्हते. मी नेहमीच आव्हानात्मक काम केले आहे. बिग बॉसमध्ये देखील चॅलेंज स्वीकारायला आवडेल. तीन महिने तिथे राहणे कठीण आहे. तिथे मी योगा, व्यायाम व संगीतचा रियाज करेन. '
'बिग बॉस'च्या बाराव्या सीझनमध्ये भारती सिंग, हर्ष लिंबाचिया व अनूप जलोटा यांच्यासह आणखीन कोण सेलेब्रिटी एन्ट्री करणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Bhajan Samrat Anup Jalota's entry in Bigg Boss 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.