भारतीमुळे हर्ष सहभागी होणार 'या' रिअलिटी शोमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 19:00 IST2018-12-19T19:00:00+5:302018-12-19T19:00:00+5:30
कलर्स स्टंट, अॅक्शन, भीती आणि विजय यांचा समावेश असलेल्या 'खतरों के खिलाडी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

भारतीमुळे हर्ष सहभागी होणार 'या' रिअलिटी शोमध्ये
कलर्स स्टंट, अॅक्शन, भीती आणि विजय यांचा समावेश असलेल्या 'खतरों के खिलाडी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनला खतरों के खिलाडी जिगर पे ट्रिगर निर्माण करणार आहे आणि त्याचे चित्रीकरण अर्जेंटिना झाले आहे.
या सीझनमध्ये कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया सहभागी होणार आहेत. अंगावर शहारे आणणारे स्टंट आणि सरपटणारे प्राणी असल्यामुळे हर्षला शोमध्ये सामील व्हायचे नव्हते. हर्षला सापांची अतिशय भीती वाटते आणि त्यामुळे तो सामील होत नव्हता पण शेवटी त्याने त्याची पत्नी भारती सिंगच्या सांगण्यावरून सामील होण्याचे ठरविले. त्याच्या भीतीवर मात करण्यासाठी भारती सिंगने त्याला शोमध्ये सामील होण्याचा सल्ला दिला आहे.
त्याच्या अनुभवाविषयी सांगताना, हर्ष म्हणाला, “ जेव्हा माझ्याकडे हा शो आला तेव्हा मला खात्री नव्हती आणि मी तो स्विकारण्याआधी काही सेकंद विचार केला. माझी पत्नी भारती नेहमी मला पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील वेगवेगळी आव्हाने स्विकारण्यासाठी प्रोत्साहन देत असते. तिच्या प्रोत्साहनामुळे मी सुध्दा मला सर्वात जास्त भीती वाटत असणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्याचा समावेश असलेले स्टंट सुध्दा करू शकलो आहे.