एकेकाळी खाण्याचेही होते वांदे, भारती सिंग आज जगतेय राजेशाही आयुष्य; संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 11:36 AM2023-07-03T11:36:39+5:302023-07-03T11:41:35+5:30
पंजाबमधील अमृतसर येथे लहानाची मोठी झालेल्या भारतीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
भारती सिंग ( Bharti Singh )आज टीव्हीची कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते. इंडस्ट्रीत गॉडफादर नसताना तिनं स्वबळावर स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं. आज भारती तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतूीचा इथपर्यंतचा प्रवास सोप्पा नव्हता. यासाठी तिचा बरेच स्ट्रगल करावं लागलं.
पंजाबमधील अमृतसर येथे लहानाची मोठी झालेल्या भारतीने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. २००८ मध्ये शोबिज की दुनिया या कार्यक्रमातून तिने कलाविश्वात पदार्पण केलं आणि आज लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली.परंतु, तिचा हा प्रवास सोपा नव्हता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारती सिंगची एकूण संपत्ती 22 कोटी आहे. भारती सिंग एक एपिसोड होस्ट करण्यासाठी 6 ते 7 लाख रुपये घेते. तिचे एका महिन्याचे उत्पन्न २५ लाख रुपये आहे. तर भारती वार्षिक ३ कोटींहून अधिक कमावते. कपिलच्या शोसाठी भारती ५ ते ६ लाख रुपये घेते.
पण याचं भारती बालपण खूप हालाखीची परिस्थिती गेलं. याचा खुलासा तिनंच केला मुलाखतीत केला होता. भारती म्हणाली होती, माझी आई दुसऱ्यांच्या घरी जेवन बनवायची आणि देवीसाठी कपडे शिवायची. घरात नेहमी शिलाई मशिनचा आवाज असायचा. मी 21 वर्षे याच गोंगागाट काढले आहेत. आमच्या घरी भाजीपाला नसायचा. अनेकदा मी मीठ भाकर खाऊन दिवस काढले. माझी फार मोठी स्वप्न नाहीत पण मी देवाकडे प्रार्थना करते की माझ्याकडे जे काही आहे ते असच राहू दे. आम्ही मीठ आणि भाकरी खाल्ली आहे पण आता आमच्याकडे डाळ, भात, भाकरी सगळं काही आहे. मला आशा आहे की माझ्या परिवाराकडे कमीत कमी डाळ तरी खाण्यासाठी असेन. मला आता ते दिवस पुन्हा भोगायचे नाहीत, असं ती या मुलाखतीत म्हणाली होती.
नॅशनल लेव्हलची शूटर
आज भारतीला पाहून ती कधीकाळी नॅशनल लेव्हलची शूटर होती, यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही. पण भारती एक नॅशनल लेव्हलची रायफल शूटर होती. 12 वर्षापूर्वी नॅशनल लेव्हलवर पंजाबकडून खेळलीआहे. खेळत असताना तिला सरकारकडून फुकट जेवण मिळायचं, सोबत रोजचे 15 रूपये आणि 5 रूपयांचं एक कुपन मिळायचं. 5 रूपयाच्या कुपनने ती रोज ज्यूस प्यायची. जेणेकरून तिला प्रॅक्टिस करताना ताकद मिळेल. काही कूपन वाचवून महिन्याअखेर ती त्यातून फळं खरेदी करून घरी न्यायची.