भाऊ कदमने सोशल मीडियावर शेअर केला आमिर खानसोबतचा खास फोटो, फॅन्सकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 01:31 PM2019-03-20T13:31:16+5:302019-03-20T13:34:11+5:30

डोक्यावर टोपी, सदरा लेंगा असा भाऊ आणि आमिरचा लूक या फोटोत आहे. तर किरण रावनंही मराठमोळ्या अंदाजात पैठणी परिधान केली आहे.

Bhau Kadam shares photo on social media, Bhau & Amir khan together | भाऊ कदमने सोशल मीडियावर शेअर केला आमिर खानसोबतचा खास फोटो, फॅन्सकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव

भाऊ कदमने सोशल मीडियावर शेअर केला आमिर खानसोबतचा खास फोटो, फॅन्सकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव

चला हवा येऊ द्या’ या कॉमेडी शोमधून रसिकांना खळखळून हसवणारा, त्यांची सगळी दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे भालचंद्र कदम म्हणजे रसिकांचा लाडका भाऊ कदम. 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये भाऊचं प्रत्येक रुप रसिकांना चांगलंच भावतं. कॉमेडीचं भन्नाट टायमिंग, अभिनय कौशल्य यामुळे भाऊ कदम रसिकांचा लाडका बनला आहे. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे रसिकांना खळखळून हसवण्यास भाऊ भाग पाडतो. भाऊ कदमनं साकारलेल्या प्रत्येक भूमिका आजही रसिकांच्या मनावर गारुड घालून आहेत. 

आपला लाडका विनोदवीर सोशल मीडियावरही सक्रीय असतो. या माध्यमातून तो फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करतो. नुकताच त्याने शेअर केलेला एक फोटो फॅन्सच्या पसंतीस पात्र ठरतोय. भाऊने हिंदी चित्रपटसृष्टीचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत भाऊ आमिर आणि त्याची पत्नी किरण रावसोबत पाहायला मिळतो आहे. विशेष लक्षणीय बाब म्हणजे यात भाऊसह आमिर आणि किरण रावही मराठमोळ्या अवतारात पाहायला मिळत आहेत. डोक्यावर टोपी, सदरा लेंगा असा भाऊ आणि आमिरचा लूक या फोटोत आहे. तर किरण रावनंही मराठमोळ्या अंदाजात पैठणी परिधान केली आहे. नाकात नथ, डोक्यावर पदर असा किरण राव लूक पाहायला मिळत आहे. भाऊच्या या फोटोवर सोशल मीडियावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव सुरू आहे. 
 

Web Title: Bhau Kadam shares photo on social media, Bhau & Amir khan together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.