विधवा पुनर्विवाह विरोधात उभे राहणार भीमराव रमाबाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 04:49 PM2022-07-26T16:49:50+5:302022-07-26T16:52:12+5:30

१९२० मध्ये बाबासाहेबांनी विधवांशी संबंधित अंत्यविधींवर बंदी घातली. आणि नंतर, त्यांनी "द हिंदू कोड बिल"चे प्रतिनिधित्व केले, ज्‍यामधून मालमत्तेसाठी महिलांचे हक्‍क, मालमत्तेचा वारसाहक्‍क, देखभाल, विवाह, घटस्फोट, दत्तक, अल्पसंख्याक आणि पालकत्वाची घोषणा करण्‍यात आली.''

Bhimrao & Ramabai to stand up against society for widow Remarriage | विधवा पुनर्विवाह विरोधात उभे राहणार भीमराव रमाबाई

विधवा पुनर्विवाह विरोधात उभे राहणार भीमराव रमाबाई

छोट्या पडद्यावर 'एक महानायक – डॉ. बी. आर. आम्‍बेडकर'मधील कथानकात आता विलक्षण वळण येणार आहे. भीमराव (अथर्व) व रमाबाई (नारायणी महेश वर्णे) यांनी पीडितेला तिचे अधिकार समजण्‍यास आणि दिलेल्‍या वाईट वागणूकीसाठी योग्‍य नुकसानभरपाईची मागणी करण्‍यास मदत केली. आणि आता आगामी कथानक विधवा पुनर्विवाहाच्‍या आणखी एका मुलभूत पैलूला दाखवणार आहे. या समस्‍येमधील विधवा असणार आहे नरोतम जोशीची सख्खी बहीण, जिच्‍या पतीचे निधन झाले आहे. तिचा दीर तिच्‍याशी विवाह करण्‍याचा प्रस्‍ताव मांडतो, ज्‍यामुळे तिचे आईवडिल आणि सासरची माणसे तिला हद्दपार करतात. भीमराव आणि रमाबाई विधवाला तिचे अधिकार मिळवून देण्‍यामध्‍ये आणि तिच्‍या दीरासोबत विवाह करण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी समाजाविरोधात उभे राहतील.

तरूण भीमरावांची भूमिका साकारणारा अथर्व म्‍हणाला, ''डॉ. बी. आर. आंबेडकर हे महिला सक्षमीकरणाचे सर्वात मोठे समर्थक होते आणि त्यांनी महिला मुक्‍तीचा मार्ग मोकळा केला. त्यांनी भारतातील महिलांच्या हक्कांचे प्रबळपणे समर्थन केले आणि महिलांच्या हक्‍कांचे रक्षण व प्रगती करण्यासाठी अनेक कायदे तयार केले. 

१९२० मध्ये बाबासाहेबांनी विधवांशी संबंधित अंत्यविधींवर बंदी घातली. आणि नंतर, त्यांनी "द हिंदू कोड बिल"चे प्रतिनिधित्व केले, ज्‍यामधून मालमत्तेसाठी महिलांचे हक्‍क, मालमत्तेचा वारसाहक्‍क, देखभाल, विवाह, घटस्फोट, दत्तक, अल्पसंख्याक आणि पालकत्वाची घोषणा करण्‍यात आली.'' रमाबाई यांची भूमिका साकारणारी नारायणी महेश वर्णे म्‍हणाली, ''बाबासाहेबांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे 'महिलांच्या सोबतीशिवाय एकता निरर्थक आहे. 

सुशिक्षित महिलांशिवाय शिक्षण निष्फळ आहे आणि महिलांच्या ताकदीशिवाय आंदोलन अपूर्ण आहे'. डॉ. आंबेडकर यांनी महिला अधिकारांना चालना देण्‍यामध्‍ये मदत केली. पूर्वी महिला बळी पडायच्‍या आणि त्‍यांना कौटुंबिक हिंसाचार, विधवांचे शोषण, विधवांचे पुनर्विवाह इत्यादींसारख्या अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागले. 

बाबासाहेबांनी अशा प्रथांच्या विरोधात लढा देऊन महिलांच्या हक्‍कांचे प्रबोधन तर केलेच पण भारतीय संविधानात महिलांना समानतेची वागणूक मिळावी यासाठी तरतूदही केली. त्यांनी महिलांना समानतेची तरतूद सर्व प्रवाहांमध्‍ये लागू केली, मग ती शिक्षण, रोजगार किंवा सामाजिक आणि आर्थिक हक्‍क असो, बाबासाहेबांच्या कायदेविषयक सुधारणांमुळे आज महिला केवळ त्यांच्या हक्‍कांबद्दल जागरूक नाहीत तर स्वावलंबी देखील आहेत.''

Web Title: Bhimrao & Ramabai to stand up against society for widow Remarriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.