'हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लंडनमधील आंबेडकरांच्या निवासस्थानाचा फोटो शेअर करत म्हणाला- 'भीमराया...'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 05:11 PM2022-10-18T17:11:28+5:302022-10-18T17:12:06+5:30

Gaurav More : गौरव मोरे छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचला.

'Bhimraya...', a special post written by Gaurav More sharing a photo of Ambedkar's residence in London | 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लंडनमधील आंबेडकरांच्या निवासस्थानाचा फोटो शेअर करत म्हणाला- 'भीमराया...'

'हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लंडनमधील आंबेडकरांच्या निवासस्थानाचा फोटो शेअर करत म्हणाला- 'भीमराया...'

googlenewsNext

फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून प्रचलित असणारा कॉमेडीचा किंग गौरव मोरे (Gaurav More) आपल्या विनोदी कौशल्याने रसिकांना लोटपोट व्हायला भाग पाडतो. गौरव मोरे छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून घराघरात पोहोचला. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याने मराठी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी छाप उमटविली आहे. सध्या तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला आहे.  तिथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाला त्याने भेट दिली. त्याचा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

गौरव मोरेने इंस्टाग्रामवर लंडनमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाचा फोटो शेअर करत लिहिले की, भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. कोणते आकाश हे, तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख हे, पिंजरे गेले कुठे? या भराया आमुच्या, ही पाखरांची वंदना. तुमच्यामुळे आज आमच अस्तित्व आहे. आमच्या श्वासावर तुमचे उपकार आहेत बाबा.

सध्या गौरव मोरे सोबत अभिनेता भरत जाधव, निखिल चव्हाण आणि माधुरी पवारही चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने लंडनमध्ये आहेत. याआधी गौरवने ‘हवाहवाई’ चित्रपटात काम केले आहे. त्याचा फॅन फॉलोव्हिंग मोठा आहे. विनोदी अभिनयाने त्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. 
 

Web Title: 'Bhimraya...', a special post written by Gaurav More sharing a photo of Ambedkar's residence in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.