भूमी पेडणेकर ह्या वयात पहिल्यांदा पडली होती प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 06:00 AM2019-01-19T06:00:00+5:302019-01-19T06:00:00+5:30

अभिनेत्री भूमी पेडणेकर व अभिनेता सुशांत सिंग राजपूत लवकरच सोन चिरैया चित्रपटात झळकणार आहेत.

Bhumi Pudankar was the first time fall in love at this age | भूमी पेडणेकर ह्या वयात पहिल्यांदा पडली होती प्रेमात

भूमी पेडणेकर ह्या वयात पहिल्यांदा पडली होती प्रेमात

googlenewsNext


स्टार प्लस वाहिनीवरील ‘कानपूरवाले खुराणाज’ या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे, ते योग्यच आहे. या मालिकेत आतापर्यंत बॉलिवूजमधील दिग्गज सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. नुकतेच ‘सोन चिरैया’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची नायिका भूमी पेडणेकर हे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी भूमीने ती सहावी इयत्तेत असताना पहिल्यांदा प्रेमात पडल्याचे सांगितले. तसेच यावेळी सुशांतने देखील त्याच्या आयुष्यातील काही प्रसंग सांगितले.


या मालिकेशी निकटचे संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “सुशांतसिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर यांनी ‘कानपूरवाले खुराणाज’ या मालिकेच्या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या कार्यक्रमात आल्यापासून सुशांत आणि भूमी यांनी धमाल करण्यास सुरुवात केली. ते या कार्यक्रमात क्रिकेट खेळले आणि त्यांनी एकमेकांबाबत मजेशीर किस्सेही सांगितले.


 सुशांतने सांगितले की त्याची बहीण ही राज्य स्तरावरील क्रिकेट खेळाडू असली, तरी त्याला तिच्याबद्दल खात्री नव्हती. तो स्वत: कधी शाळेतल्या क्रिकेटच्या संघातही निवडला गेला नव्हता. पण त्याने काय पो छे आणि एम. एस. धोणी या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या. 


भूमीने सांगितले की, ती सहावीत असताना प्रथम एकाच्या प्रेमात पडली होती आणि त्या मुलाचे स्थान आजही तिच्या फेसबुकवरील मित्रांच्या यादीत कायम आहे.” यावेळी फराह खानने सुशांतसाठी घरी बनविलेले जेवण आणले होते.
‘स्टार प्लस’वरील ‘कानपूरवाले खुराणाज’ या मालिकेत नामवंत विनोदी अभिनेता सुनील ग्रोव्हर याच्याबरोबर सुशांतसिंह राजपूत आणि भूमी पेडणेकर यांना धमालमस्ती करताना पाहणे ही प्रेक्षकांसाठी नक्कीच तुफान करमणुकीची गोष्ट ठरेल.

Web Title: Bhumi Pudankar was the first time fall in love at this age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.