Big Boss 11 : अर्शी खानच्या पुणे सेक्स रॅकेट प्रकरणात समोर आले धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 01:50 PM2017-10-28T13:50:31+5:302017-10-28T19:20:31+5:30
गेल्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये सपना चौधरी हिने अर्शी खान हिच्याबद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे केल्याने घरात एकच खळबळ उडाली आहे. सपनाने ...
ग ल्या शुक्रवारच्या एपिसोडमध्ये सपना चौधरी हिने अर्शी खान हिच्याबद्दलचे अनेक धक्कादायक खुलासे केल्याने घरात एकच खळबळ उडाली आहे. सपनाने अर्शी खानच्या भुतकाळातील काही घटनांवरील पर्दाफाश केल्याने सध्या अर्शी चर्चेत आली आहे. जेव्हा अर्शी आणि सपना हिच्यात वाद झाला तेव्हा सपनाने तिला म्हटले की, ‘मला माहिती आहे की, तू गोवा आणि पुण्यात काय केले?’ सपनाचे हे बोल ऐकताच अर्शीच्या डोळ्यात अश्रू आले. मात्र सपनाला हे कसे कळाले याचा जेव्हा अर्शीने शोध घेतला तेव्हा यामागे प्रियांक शर्मा सूत्रधार असल्याचे पुढे आले. तिने प्रियांकला जाब विचारताना सपना मला ब्लॅकमेल करीत असल्याचे म्हटले. कारण हरियाणाची डान्सर असलेल्या सपनाने तिला धमकी देत म्हटले की, ‘तुझे सर्व कांड एक्सपोज करणार आहे.’
ही गोष्ट आॅक्टोबर २०१६ची आहे. जेव्हा अर्शी खानचे पुण्यातील एका सेक्स रॅकेटमध्ये नाव आले होते. पुणे मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार पुणे पोलिसांनी अर्शी खानला या प्रकरणात अटक केली होती. असे म्हटले जाते की, विपुल दहल आणि कृष्णा कफाले तिचे एजंट होते. ज्यांना पोलिसांनी अटक केली होती, तर अर्शीला वानवरी येथील रेस्क्यू होममध्ये नेण्यात आले होते. मात्र अर्शी तेथून पळून गेली होती. मात्र काही दिवसांनंतर अर्शीने एका मुलाखतीत सांगितले होते की, मी पळून गेली नव्हती हे सर्व खोटे आहे.
ALSO READ : अर्शी खानला एकदा नव्हे तर दोनदा झाली सेक्स रॅकेटमध्ये अटक; गोवा-पुणे कनेक्शन आले समोर!
पुढे हे प्रकरण एवढे वाढले होते की, अर्शीच्या टीममधील एकाने सांगितले की, त्यावेळी एका पोलीस अधिकाºयाने अर्शीकडे सेक्शुअल फेव्हरची मागणी केली होती. वास्तविक पुणे पोलिसांच्या हाती अर्शीचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड लागले होते. दोन्हीवरही अर्शीचे नाव वेगवेगळे होते. शिवाय जन्मतारखेतही तफावत होती. ज्यामुळे पोलिसांनी तिला पंधरा लाखांची मागणी केली होती. मात्र तिने यास नकार दिल्याने तिला अटक करण्यात आली. त्याचबरोबर एका पोलिसाने तिला सेक्सुअल फेव्हरची मागणीही केली होती.
वास्तविक या प्रकरणात अद्यापपर्यंत काहीच समोर आलेले नाही. परंतु अर्शीच्या या पास्टने घरात एकच खळबळ उडवून दिली आहे. शिवाय बाहेरच्या दुनियेत अर्शीचे हे प्रकरण चवीने चर्चिले जात आहे. आता वीकेण्ड का वॉरमध्ये सलमान सपनाची कसा क्लास घेतो हे बघणे मजेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणातला मुख्य सूत्रधार प्रियांकबद्दल सलमान काय भूमिका घेईल हे बघणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.