Bigg Boss 15: बहोत बडा हाथ मारा है भाई ने..., विशालचा ‘तो’ व्हिडीओ पाहून शमिता शेट्टीची आई संतापली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 10:41 AM2021-11-12T10:41:28+5:302021-11-12T10:43:01+5:30
Bigg Boss 15: राकेश बापटची पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धीही खवळली; म्हणाली, याला बाहेर काढा... वाचा काय आहे प्रकरण
‘बिग बॉस’च्या घरात काय होईल याचा नेम नाही. तिकडे बिग बॉसच्या घरात अनेक गोष्टी घडतात आणि बाहेरच्या जगातही त्याचे पडसाद उमटतात. आता ‘बिग बॉस 15’चे (Bigg Boss 15) उदाहरण घ्या. ‘बिग बॉस 15’चा स्पर्धक विशाल कोटियन (Vishal Kotian) काहीतरी बरळला आणि शमिता शेट्टीची (Shamita Shetty) आई आणि राकेश बापटची (Raqesh Bapat) पूर्वाश्रमीची पत्नी दोघीही संतापल्या.
काय म्हणाला विशाल?
‘बिग बॉस 15’चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात विशाल शमिता व राकेश बापट यांच्या नात्याबद्दल बोलताना दिसतोय. बिग बॉसच्या घरात विशालने शमिताला बहिण मानलं आहे. पण व्हायरल व्हिडीओमध्ये तो शमिता व राकेशच्या नात्याची खिल्ली उडवताना दिसतोय.
‘बहुत बडा हाथ मारा है अपने भाई(राकेश)ने, सीधा उसकी (शिल्पा शेट्टी) की बहन को पटा लिया है. अब क्या है कि उसके दम पर यह शो से वो शो, वो शो से यह शो करता रहता है, उसका चलता रहेगा’, असे विशाल या व्हिडीओत म्हणताना दिसतोय. या व्हिडीओत करण कुंद्रा व तेजस्वी प्रकाशही आहेत.
राकेशची एक्स-वाईफ खवळली
There r those that play by mocking people behind their backs and then give nonstop explanation for their sneakiness by calling it 'funny' & those playing with truth and a game's spirit.
— Ridhi Dogra (@iRidhiDogra) November 10, 2021
Audience - Would you like being mocked? If not take these ppl out. Simple. Period. https://t.co/pGDvVo0oXw
विशालचा हा व्हिडीओ पाहून राकेश बापटची पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धी डोगरा चांगलीच खवळली आहे.
‘हे तेच लोक आहेत जे लोकांच्या पाठीमागे त्यांची थट्टा करतात आणि नंतर ही सगळी मस्करी होती असं सांगत स्पष्टीकरण देत बसतात. प्रेक्षकांनो, तुम्हाला अशी थट्टा आवडेल का? आवडणार नसेल तर सोप्प आहे,अशा लोकांना शोमधून बाहेर काढा,’ असे ट्वीट रिद्धीने केले आहे.
शमिताची आई देखील संतापली
https://t.co/TFebohcN5z
— Sunanda Shetty (@SunandaShetty5) November 10, 2021
🐍Vishal Kotian usual best bitching at Shamita - he calls Akka (sister)& drags her family most untrustworthy 😡simply not done #ShamitaShetty#ShaRa#BeingSalmanKhan@TheShilpaShetty#OrmaxMedia#Colors15#QueenShamita#EndemolShine#ShamitalsTheBoss
विशालला शमिता व राकेशच्या नात्याची अशाप्रकारे खिल्ली उडवताना पाहून शमिताची आई सुनंदा शेट्टीही संतापल्या आहेत. त्यांनीही ट्वीट करत आला संताप व्यक्त केला.
‘सर्वात घाणेरडी क्लीप.. बिग बॉस 15 मधील सर्वात विश्वासघातील माणूस विशाल कोटियनची लाज वाटते,’ असे लिहित सुनंदा यांनी आपल्या ट्वीटमध्ये सापाचा इमोजी शेअर केला आहे.हा माणूस (विशाल) आपल्या दिवंगत आईच्या शपथा घेतो, अपमान करतो आणि मग मी किती चांगला असं दर्शवतो. अशा माणसावर कधीही भरवसा ठेऊ नका, असेही सुनंदा यांनी पुढे लिहिले आहे.