Big boss 2 : महेश मांजरेकर गाणार मराठी रॅप साँग  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 07:15 AM2019-05-14T07:15:00+5:302019-05-14T07:15:00+5:30

रणवीर सिंगने गली बॉयच्या चित्रपटाच्या माध्यमातून धमाकेदार रॅप सादर केल्यानंतर आता महेश मांजरेकर बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत रॅप साँग.

Big Boss 2: Mahesh manjrekar will sing marathi Rap | Big boss 2 : महेश मांजरेकर गाणार मराठी रॅप साँग  

Big boss 2 : महेश मांजरेकर गाणार मराठी रॅप साँग  

googlenewsNext
ठळक मुद्देदुसऱ्या सीझनसाठी महेश मांजरेकर यांनी नुकतंच एक रॅप साँग शूट केले

रणवीर सिंगने गली बॉयच्या चित्रपटाच्या माध्यमातून धमाकेदार रॅप सादर केल्यानंतर आता महेश मांजरेकर बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत रॅप साँग. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनसाठी महेश मांजरेकर यांनी नुकतंच एक रॅप सॉंग शूट केले जे त्यांनी स्वतः गायले आहे. महेश मांजरेकर यांचा डॅपर लुक आणि विंटेज बीटल रेट्रो गाडीवर बसून त्यांची या रॅप सॉंगमधली एन्ट्री एकदम कडक आहे. या कार्यक्रमाचे अनेक प्रोमोज महेश मांजरेकरांनी शूट केले असून प्रत्येक प्रोमोमध्ये त्यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळतो आहे. महेश मांजरेकरांच्या या वेगवेगळ्या लुक्समुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणते सेलेब्रिटी जाणार याबद्दल प्रेक्षकांनी बरेच तर्क देखील लावण्यास सुरुवात केली आहे. 

बिग बॉस मराठीमध्ये कोण कोणते कलाकार सहभागी होणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी प्रोमो शेअर केला असून या प्रोमोंमधून लोकांना याविषयी हिंट देण्यात आली आहे. एबीपी माझा वृत्त वाहिनीने 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांची संभाव्य यादी जाहिर केली आहे.

या यादीत त्यांनी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेता मिलिंद शिंदे, कवी मनाचे नेते म्हणून प्रचलित असलेले अभिजीत बिचुकले, अभिनेत्री रसिका सुनील, अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री मनवा नाईक, अभिनेत्री केतकी चितळे किंवा गायिका केतकी माटेगांवकर, टिकटॉक गर्ल अभिनेत्री अमृता देशमुख, अभिनेता दिगंबर नाईक, अभिनेत्री सुरभी हांडे, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, अभिनेत्री नेहा पेंडसे किंवा नेहा गद्रे किंवा नेहा शितोळे ही नावे चर्चेत आहेत.
 

Web Title: Big Boss 2: Mahesh manjrekar will sing marathi Rap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.