बिग बॉस : ...अन् सलमानने मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 04:01 PM2016-12-25T16:01:06+5:302016-12-25T16:23:15+5:30
सध्या सलमान खान त्याच्या आगामी चित्रपटांपेक्षा बिग बॉस या रिअॅलिटी शोमुळे अधिक चर्चेत आहे. कारण या शोचा व्हेरी व्हेरी ...
For the first time in the history of Bigg Boss, @BeingSalmanKhan evicts a contestant! Do you think his decision is right? #BB10WeekendKaVaarpic.twitter.com/cnrYnx6bna— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016}}}} ">http://
}}}} ">For the first time in the history of Bigg Boss, @BeingSalmanKhan evicts a contestant! Do you think his decision is right? #BB10WeekendKaVaarpic.twitter.com/cnrYnx6bna— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016
For the first time in the history of Bigg Boss, @BeingSalmanKhan evicts a contestant! Do you think his decision is right? #BB10WeekendKaVaarpic.twitter.com/cnrYnx6bna— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016
गेल्या आठवड्यात स्वयंघोषित बाबा स्वामी ओम यांच्यापेक्षाही वादग्रस्त ठरलेल्या प्रियंका जग्गा हिने शोचे सर्व नियम पायदळी तुटवड घरातील अन्य कंटेस्टेंटना सडो का पळो करून सोडले होते. आतापर्यंतच्या एकाही सीजनमध्ये घडले नसेल असे कारनामे प्रियंका जग्गा हिने केल्याने निर्मातेही दंग राहिले. त्यामुळे त्यांनी शोमधील बºयाचशा भागाला कात्री लावत मोजकाच भाग प्रेक्षकांसमोर सादर केला. प्रियंकाने मोनालिसा, मनू पंजाबी, लोपामुद्रा राऊत यांच्यासह मनवीर, नीतिभा यांना लक्ष करीत त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर अतिशय अश्लाघ्य भाषेत कमेंट केल्या. मनू पंजाबीला त्याच्या मृत आईवरून शिवीगाळ केली तर, मोनालिसा हिच्या शारीरिक रचनेवर कमेंट करीत घरातील सर्वच नियमांच्या मर्यादा ओलांडल्या. विशेष म्हणजे प्रियंकाला तिच्या या वर्तवणुकीवरून बिग बॉसने वेळोवेळी सूचना दिल्या. मात्र तिने तिच्या वर्तवणुकीत अखेरपर्यंत सुधारणा केली नाही.
Not worthy of being a part of #BB10, @BeingSalmanKhan asks #PriyankaJagga to leave the Bigg Boss house! #BB10WeekendKaVaarpic.twitter.com/RA3RoccweP— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016}}}} ">http://
}}}} ">Not worthy of being a part of #BB10, @BeingSalmanKhan asks #PriyankaJagga to leave the Bigg Boss house! #BB10WeekendKaVaarpic.twitter.com/RA3RoccweP— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016
Not worthy of being a part of #BB10, @BeingSalmanKhan asks #PriyankaJagga to leave the Bigg Boss house! #BB10WeekendKaVaarpic.twitter.com/RA3RoccweP— Bigg Boss (@BiggBoss) December 24, 2016
त्यामुळे सलमानच्या वीकेण्ड का वॉर या शोमध्ये सलमानच प्रियंकाचा समाचार घेईल अशी चर्चा रंगली होती. अगदी तसेच घडले. सलमानने शोच्या सुरुवातीलाच प्रियंकाच्या असभ्य आणि असंस्कृत वागणुकीवर टीका करताना आपण या शोचा होस्ट असल्याचे वाइट वाटत असल्याचे म्हटले. कोणी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो का? असा प्रश्न तो स्वत:लाच विचारत होता. तसेच ज्या प्रेक्षकांनी गेल्या आठवड्यात हा शो बघितला नसेल किंवा त्यांनी शोमधील कारनामे बघून चॅनेल बदलले असेल त्या लोकांच्या भावना मी समजू शकतो असेही त्याने म्हटले. बिग बॉसच्या शोमध्ये असा प्रकार कधीच घडला नव्हता, यास आपण एंटरटेन्मेंट म्हणूच शकत नाही, असेही तो वारंवार म्हणत होता.
जर शो अशा पद्धतीने चालत असेल तर लहानग्यांनी हा शो बघू नये असे आवाहनही त्याने केले. यावेळी शोमधील काही टेलिकास्ट न केलेला भाग दाखविताना त्याने प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या लहान मुलांना बाहेर जाण्यास सांगितले. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की सलमान प्रियंका जग्गा हिच्या अश्लाघ्य बोलीवरून किती संतप्त झाला असेल. त्याने घरातील कंटेस्टेंटसोबत लाइव्ह टीव्हीच्या माध्यमातून संवाद साधण्यापूर्वीच स्वामी ओमचे एका कपड्याने तोंड बंद करायला लावले, तर प्रियंका जग्गा हिचे फारसे ऐकून न घेता ‘लिव्ह माय होम’ असे म्हणत तिची हकालपट्टी केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने कलर्स चॅनेलला बजावून सांगितले की, जर प्रियंका जग्गा पुन्हा या शोमध्ये नाही तर या चॅनेलवर जरी दिसली तरी मी त्यांच्यासोबत कुठल्याच प्रकारचे काम करणार नाही, अशा ठणकावले.
सलमानचा हा अंदाज मात्र घरातील इतर कंटेस्टेंटसह प्रेक्षकांना चांगलाच भावला. तसेच प्रियंका जग्गा हिची केलेली थेट हकालपट्टी शोच्या इतिहासात नोंद करणारी ठरली.