बिग बॉस : बायफ्रेंडच्या निर्णयाने मोनाच्या डोळ्यात आले अश्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 02:39 PM2016-12-16T14:39:20+5:302016-12-16T14:39:20+5:30
बिग बॉसच्या घरात जुळलेल्या नात्यांचा परिणाम आता बाहेरच्या नात्यांवर होताना स्पष्ट दिसत आहे. कारण बिग बॉसच्या घरात मोनालिसा आणि ...
ब ग बॉसच्या घरात जुळलेल्या नात्यांचा परिणाम आता बाहेरच्या नात्यांवर होताना स्पष्ट दिसत आहे. कारण बिग बॉसच्या घरात मोनालिसा आणि मनू पंजाबी यांच्यात बहरलेल्या लव्ह स्टोरीमुळे मोनालिसाचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याने तिच्याशी नाते तोडण्याचा निर्णय घेतला आहे. जेव्हा मनूने ही बातमी मोनाला सांगितली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले होते.
आईच्या निधनामुळे काहीकाळ घराबाहेर राहिलेल्या मनू पंजाबी याच्या घरातील रिएंट्रीमुळे सध्या अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. घरात एंट्री करताच ‘तुला तुझे आई -वडील घरात पाय सुद्धा ठेवू देणार नाहीत’ असे ठणकावून सांगणाºया मनूचे मोनालिसाला धक्के देणे सुरूच आहे. मनूने मोनालिसाला लगेज रूममध्ये सांगितले की, जेव्हा आईच्या निधनानंतरचे विधी पार पाडण्यासाठी मी काहीकाळ घराबाहेर होते तेव्हा तुझा बॉयफ्रेंड (विक्रांत सिंह) मला भेटला. त्याने जे मला सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. तो म्हणाला की, मला आता मोनाबरोबर कुठल्याही प्रकारचे नाते ठेवायचे नाहीत. मनूचे हे शब्द ऐकताच मोना ढसाढसा रडायला लागली. ती बराच काळ एकटी शांतपणे बसलेली होती.
या अगोदरदेखील जेव्हा विक्रांत सिंह सलमानच्या ‘वीकेण्ड का वॉर’मध्ये आला होता, तेव्हा त्याने मोनालिसाचे वागणे केवळ शोचा एक भाग असल्याचे म्हटले होते. मात्र आता त्याचा बदलेला हा निर्णय मोनासाठी नक्कीच धक्कदायक ठरेल यात शंका नाही.
दरम्यान, शोच्या पहिल्या दिवसापासून मोना मनूकडे आकर्षित होती. पुढे या दोघांची लव्ह स्टोरी चांगलीच बहरली होती. जेव्हा मनूला घराबाहेर पडावे लागले तेव्हा मोनालिसा खूपच गहिवरली होती. तो घरात नसल्याने ती गेममधून पूर्णपणे बाहेर पडली होती. ती कुठल्याच टास्कमध्ये मनापासून सहभागी होत नव्हती. मनूची कमतरता तिला स्पष्टपणे दिसत होती. याचदरम्यान मनूला काही दिवस सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा मोनाची गौरवप्रती जवळीकता वाढली होती. हे बघून मनूचा संताप वाढला होता. आता त्याचाच बदला म्हणून मनू विक्रांतने दिलेले सर्व मॅसेजेस जसास तसेच मोनाला सांगत आहे.
त्यामुळे मोनाला केवळ घरातच वादाचा सामना करावा लागत आहे असे नाही तर, घराबाहेर पडल्यानंतरही तिला टीकेचे धनी व्हावे लागेल हे मात्र नक्की.