बिग बॉस स्पर्धक बंदगी कालराच्या भावाचे निधन; सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 10:55 AM2018-03-22T10:55:38+5:302018-03-22T16:25:54+5:30
बिग बॉसची एक्स स्पर्धक असलेल्या बंदगी कालराने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर करीत, चुलत भावाचे निधन झाल्याचे सांगितले आहे.
ब ग बॉसच्या सीजन ११ ची स्पर्धक बंदगी कालरा हिच्या चुलत भावाचे वयाच्या १८व्या वर्षी फुफ्फुसाच्या कर्करोगाने निधन झाले. याविषयी बंदगीने सोशल मीडिया अकाउंटवर भावाचा फोटो शेअर करताना एक भावनिक संदेश पोस्ट केला. बंदगी आणि तिच्या कुटुंबीयांना आठवडाभरापूर्वीच कळाले होते की, तो फुफ्फुसाचा कर्करोग या आजाराच्या अखेरच्या स्टेजमध्ये आहे. बंदगीला जेव्हा चुलत भावाच्या निधनाची बातमी समजली तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला. तिने एक पोस्ट शेअर करताना आपल्या दु:खाला वाट मोकळी करून दिली.
बंदगीने इन्स्टाग्रामवर भावाचा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘मी माझ्या १८ वर्षीय चुलत भावाला दोन दिवसांपूर्वीच गमावून बसले. आठवडाभरापूर्वीच त्याला लंग कॅन्सर झाल्याचे आम्हाला समजले होते. तो एकदम धडधाकट होता. अशातही आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. माझ्यासाठी ही बातमी खूप धक्कादायक आहे. यातून सावरणे मला खूप अवघड होणार आहे. असे वाटत आहे की, या धक्क्यात मी कायम राहणार आहे. खरं तर आयुष्याबद्दल काहीही सांगणे अवघड असते. कधीही काहीही होऊ शकते. आयुष्यात सर्वकाही मिळाले असले तरी त्याबद्दल खात्री देता येत नाही. आपल्याला हे माहिती नसते की, आप्तस्वकीयांबरोबर आपण किती काळ असणार? मला या घटनेमुळे खूप मोठा धडा मिळाला आहे. आजपासून मी माझ्या जवळच्या लोकांसोबत अधिकाधिक राहणे पसंत करणार. कारण उद्या काय होणार हे कोणालाच माहिती नाही.
दरम्यान, बंदगी बिग बॉसच्या सीजन ११ मध्ये सहभागी झाली होती. बिग बॉसच्या घरात पुनीश शर्मासोबतच्या तिच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच बंदगी आणि पुनीशने विरूष्काची कॉपी करीत एक फोटो शेअर केला होता. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.