बिग बॉस : घरात ड्रग्ज सप्लाय केला जातो, स्वामी ओमचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2017 06:12 PM2017-01-06T18:12:37+5:302017-01-06T18:14:16+5:30

बिग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आलेला स्वयंघोषित बाबा स्वामी ओम याने बिग बॉस या शोवर आता आरोपांची बरसात करण्यास ...

Big Boss: Drugs supply is done in the house, Swami Omcha's charge | बिग बॉस : घरात ड्रग्ज सप्लाय केला जातो, स्वामी ओमचा आरोप

बिग बॉस : घरात ड्रग्ज सप्लाय केला जातो, स्वामी ओमचा आरोप

googlenewsNext
ग बॉसच्या घरातून हकालपट्टी करण्यात आलेला स्वयंघोषित बाबा स्वामी ओम याने बिग बॉस या शोवर आता आरोपांची बरसात करण्यास सुरुवात केली आहे. घरातील सदस्यांना शोचे निर्माते ड्रग्ज सप्लाय करीत असून, शोचा होस्ट सलमान खान हा आयएसआय एजंटसारखे काम करीत असल्याचे त्याने म्हटले आहे. 



घरात गलिच्छ वर्तणूक करणाºया स्वामी ओमची बिग बॉसने गेल्या दोन दिवसांपूर्वीच हकालपट्टी केली होती. घराबाहेर पडताच ओमने घरातील सदस्यांबरोबरच बिग बॉसवरही आरोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात केली आहे. त्याने केलेल्या आरोपानुसार, शोचे निर्माते घरातील सदस्यांसाठी ड्रग्जचा सप्लाय करतात. निर्मात्यांनी हा प्रयोग माझ्यावरदेखील केला आहे. रोज माझ्या जेवणात नशेचे पदार्थ टाकले जात असत. त्यामुळे मला नशेत ठेवून माझ्याकडून अप्रिय घटना घडवून आणल्या जात असत. स्क्रीनवर प्रेक्षकांनी माझ्याकडून ज्या काही अप्रिय घटना घडताना बघितल्या त्याला पूर्णत: शोचे निर्माते कारणीभूत आहेत. 



यावेळी स्वामी ओमने शोचा होस्ट सलमान खान याच्यावर आरोप केले आहेत. सलमान हा आयएसआय एजंटसारखा काम करीत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याचबरोबर घरातील सदस्यांना टार्गेट करताना तो बानीवरही बरसला आहे. जेव्हा जेसन शहा घरात आला होता, तेव्हा बानी त्याच्याबरोबर चार दिवस झोपली होती, तिच्या चारित्र्याचा मला दाखला देण्याची गरज नसल्याचे ओमने म्हटले आहे. 



आता स्वामी ओमच्या या आरोपांवर बिग बॉस शोचे निर्माते काय उत्तर देणार, हे बघण्यासारखे असेल. त्याचबरोबर सलमान यावर काही बोलणार की प्रियंका जग्गाप्रमाणे स्वामी ओमलाही कलर्सचे सर्व दरवाजे बंद करण्यास भाग पाडणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

Web Title: Big Boss: Drugs supply is done in the house, Swami Omcha's charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.