कास्टिंग काऊच अन् नेपोटिझमचा सामना केलाय ? शिव ठाकरेने सांगितला त्याचा इंडस्ट्रीतील अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 03:07 PM2024-08-12T15:07:34+5:302024-08-12T15:08:06+5:30

शिव आज मराठीसह हिंदी कलाविश्वातही लोकप्रिय आहे.

Big Boss Fame Shiv Thakare On His Casting Couch and nepotism Experience | कास्टिंग काऊच अन् नेपोटिझमचा सामना केलाय ? शिव ठाकरेने सांगितला त्याचा इंडस्ट्रीतील अनुभव

कास्टिंग काऊच अन् नेपोटिझमचा सामना केलाय ? शिव ठाकरेने सांगितला त्याचा इंडस्ट्रीतील अनुभव

बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीत अनेकांना 'कास्टिंग काऊच' अन् 'नेपोटिझम'चा अनुभव येतो. कलाविश्वात काम देतो या नावाखाली कॉम्प्रमाईज करण्याबाबत विचारलं जातं. तर पात्र असूनही एखादा प्रोजेक्ट नेपोटिझममुळे (nepotism) हातातून जातो. यावर मराठमोळा अभिनेता शिव ठाकरेने (Shiv Thakare) भाष्य केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान शिव ठाकरेने इंडस्ट्रीत त्याला आलेला अनुभव सांगितला.  'कास्टिंग काऊच'चा (Casting Couch) जेव्हा तुम्हाला सामना करावा लागतो, अशावेळी तुम्ही 'नाही' म्हणणं खूप गरजेचं असतं, असं मत शिव ठाकरेने मांडलं आहे.

नुकतंच शिव ठाकरेने Telly Talkला मुलाखत दिली. यावेळी नेपोटिझमवर बोलताना तो म्हणाला, "ही तर दुनियाची रीत आहे. नेपोटिझमच्या नावामागे कधी-कधी आपण आपल्यातला कमीपण लपवतो. मला नाही वाटतं नेपोटीझम चुकीचं आहे.  तुमचं आणि त्याचं काही कनेक्शनच नाही. तुम्हाला तुमच्या आणि त्यांना त्यांच्या हक्काचं मिळेल. तुमच्या हक्काचं कुणीची हिसकावू शकत नाही. आपल्यातला कमीपण लपवून अरे ही इंडस्ट्रीच अशी असं म्हणून सोडू नाही शकत. बाहेरुन आलेल्या अनेक लोकांनी आपलं नाव कमावलं आहे. आळस आणि भीती आपण नेपोटीझममागे लपवतो". 


कास्टिंग काऊचचा कधी सामान केला आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं,  "मला वाटतं या सर्व गोष्टीचा इंडस्ट्रीमध्ये आलेला व्यक्ती सामना करतो. आपल्याकडे एकच बाजू सांगितली जाते.  चुकीचे मेसेज, काही कॉम्प्रोमाइज करायला सांगतात. पण, यामध्ये जेवढी चुकी त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीची आहे. तेवढीच चुकी काम मागायला गेलेल्या लोकांचीही असते. यात अनेक लोक कॉम्प्रोमाइज करतात. मला चालेल असं म्हणतात. हाच एक रस्ता आहे, असं लोकांनी स्वीकारलं आहे. पण, मला हे फार चुकीचं वाटतं. जेव्हा माझ्या मित्रांकडून ऐकतो, ते म्हणतात की हे करावचं लागेल. करावचं लागेल म्हणजे काय तुम्हाला कुणी जबरदस्ती करत नाही. तुम्ही त्याची निवड करता. अवघड रस्ता सोडून तुम्ही त्यामार्गाने शॉर्टकट घेता. कास्टिंग काऊच आणि नेपोटिझमच्या पाठीमागे लपणं हे सर्व फालतू आहे".

शिव ठाकरेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, 'बिग बॉस सीझन १६', 'खतरों के खिलाडी सीझन १३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शिव अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेला आहे.  इतकी प्रसिद्धी मिळाल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर आहेत.  त्याच्या स्वभावातील याच साधेपणामुळे आणि चाहत्यांशी प्रेमाने वागण्याच्या सवयीमुळे तो दिवसेंदिवस लोकप्रिय ठरत आहे.
 

Web Title: Big Boss Fame Shiv Thakare On His Casting Couch and nepotism Experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.