बिग बॉस : गौरव चोपडाने स्वामी ओमला म्हटले ‘क्रिमिनल माइंड’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 10:53 PM2017-01-03T22:53:58+5:302017-01-03T22:53:58+5:30
गेल्या आठवड्यात नॉमिनेट होऊन घराबाहेर पडलेल्या गौरव चोपडा याने वादग्रस्त स्वयंघोषित बाबा स्वामी ओम यांना ‘क्रिमिनल माइंड’ असे म्हटले ...
ग ल्या आठवड्यात नॉमिनेट होऊन घराबाहेर पडलेल्या गौरव चोपडा याने वादग्रस्त स्वयंघोषित बाबा स्वामी ओम यांना ‘क्रिमिनल माइंड’ असे म्हटले आहे. स्वामी ओम हा माणूस बिग बॉसच्या घरात असूच कसा शकतो, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला.
बिग बॉसच्या घराबाहेर पडलेल्या गौरवने सांगितले की, स्वामी ओम यांना मानसिक उपचाराची गरज आहे. घरातील त्यांचा वावर नेहमीच संशयास्पद असतो. ते घरात उशाला चाकू घेऊन झोपतात. त्याचबरोबर मोठमोठे दंडूकेही त्यांच्या बेडखाली ठेवलेले असतात. बºयाचदा रात्रीच्या वेळेस ते माझ्याकडे रागाने बघत असल्याचे मला जाणवले. त्यामुळे बिग बॉसने त्यांना शक्य होईल तेवढ्या लवकर घरातून बाहेर काढायला हवे.
त्याचबरोबर गौरवने बानी आणि त्याच्यातील मैत्रीबद्दल बोलताना सांगितले की, ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे घरातच नव्हे तर घराबाहेरही आम्ही चांगले मित्र असणार आहोत. तसेच रोहन आणि राहुल देव हेदेखील माझे चांगले मित्र आहेत.
गेल्या दोन आठवड्यांपूर्वी बानी, गौरव आणि मोनालिसा नॉमिनेट झाले होते. प्रियंका जग्गाला तिच्या गैरवर्तणुकीमुळे सलमानने घराबाहेर काढल्याने हे तिघे एका आठवड्यासाठी सुरक्षित झाले होते. मात्र दुसºया आठवड्यात गौरव चोपडा याला घराबाहेर पडावे लागले. घराबाहेर पडताच त्याने स्वामी ओमवर निशाना साधताना तो व्यक्ती क्रिमिनल माइंड असल्याचे म्हटले आहे.