बिग बॉसच्या घरामध्ये आज रंगणार हा अनोखा खेळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 06:56 AM2018-05-29T06:56:27+5:302018-05-29T12:26:27+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले “बाबा गाडी घराबाहेर काढी” हे नॉमिनेशन कार्य. ज्यामध्ये बिग बॉस मराठीचे ...

Big boss house this unique game to play today! | बिग बॉसच्या घरामध्ये आज रंगणार हा अनोखा खेळ !

बिग बॉसच्या घरामध्ये आज रंगणार हा अनोखा खेळ !

googlenewsNext
र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले “बाबा गाडी घराबाहेर काढी” हे नॉमिनेशन कार्य. ज्यामध्ये बिग बॉस मराठीचे घर बनले पाळणा घर. यामध्ये असलेल्या बाहुली भोवती या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया रंगली. या बाबा गाडीमधील बाहुलीवर घरातील इतर सदस्यांचा फोटो लावण्यात आला होता. म्हणजेच प्रत्येक सदस्य दुसऱ्या एका सदस्याचे प्रतिनिधित्व करणार होते. म्हणजेच नॉमिनेशन प्रक्रिया ही घरातील इतर सदस्यांवरच अवलंबून होती. या कार्यादरम्यान सई आपल्या बाहुलीला गोष्ट सांगताना ती रेशमला डायन म्हणाली. या आठवड्यामध्ये घरातून घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेमध्ये जुई, सई, सुशांत, रेशम, आस्ताद आणि पुष्कर नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. तसेच आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे अजून एक कार्य. 

खेळाच्या या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरातील सर्व सदस्य असणार कॅप्टनसीचे उमेदवार. ही कॅप्टनसीची दावेदारी सदस्यांच्या पुढील प्रवासावर पडणार का भारी ? हे येणारा काळच ठरवेल. कॅप्टनसीमुळे मिळणारी इम्युनिटी पुढे जाण्यासाठी खूप महत्वाची असते. या कार्यामध्ये यशस्वी ठरणे म्हणजे थेट नवव्या आठवड्यामध्ये पोहचणे आहे. तसेच इतर सदस्यांकडून ही इम्युनिटी हिसकावून घेण्याची सुवर्णसंधी देखील आहे. म्हणूनच बिग बॉस सदस्यांना त्यांच्या अंतिम ध्येयाच्या आणखीन एक पाउल जवळ जाणारे “अंडे का फंडा” हे साप्ताहिक कार्य आज देणार आहेत. ज्यामध्ये मेघा, पुष्कर, आऊ, शर्मिष्ठा आणि त्यागराज यांनी तसेच इतर सदस्य त्यांची युक्ती लावणार आहेत. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण बनणार कॅप्टन हे आज कळेल. 

Web Title: Big boss house this unique game to play today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.