'बिग बॉस मराठी २' दिवस १५ ! घरामध्ये रंगणार बिग बॉस मिठाईवाला नॉमिनेशन टास्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 16:59 IST2019-06-10T16:51:14+5:302019-06-10T16:59:23+5:30
“बिग बॉस मिठाईवाला” हे नॉमिनेशन कार्य रंगणार असून यामध्ये प्रत्येक सदस्याने घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी २ सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे.

'बिग बॉस मराठी २' दिवस १५ ! घरामध्ये रंगणार बिग बॉस मिठाईवाला नॉमिनेशन टास्क
सध्या बिग बॉस शो खूप चर्चेत आहे. त्यातच अगदी पहिल्या दिवसापासून स्पर्धक त्यांच्या भांडणाने, वाद – विवादाने घर गाजवत आहेत. इथे अवघ्या बारा तेरा दिवसामध्ये ग्रुप्स देखील तयार झाले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामधून सिझन २ ची पहिली सदस्य मैथिली जावकर एलिमनेट झाली. आज घरातील सदस्यांवर बिग बॉस यांनी नाराजगी व्यक्त केली आहे. कारण सदस्य बिग बॉसच्या घराच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करताना दिसत आहेत.
बिग बॉसच्या घराचा महत्वाचा नियम म्हणजे कोणताही नियम न मोडणे. सदस्यांनी बिग बॉसच्या वारंवार दिलेल्या सूचनांनंतर देखील हे नियम तोडले, जसे मराठी भाषेचाच वापर करणे, माईक घालून घरामध्ये वावरणे, कुजबुज न करणे, बिग बॉसच्या आदेशानंतर देखील लिव्हिंग एरियामध्ये जमण्यास उशीर करणें, किंवा दिवसा न झोपणे. घरातील सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्याने न घेतल्यामुळे आज सगळे सदस्य बिग बॉस यांनी दिलेल्या शिक्षेस पात्र असणार आहेत. याचसोबत आज सदस्य तिसऱ्या आठवड्यामध्ये पदार्पण करत आहेत.
नियमभंगामुळे सदस्यांनी कॅप्टन्सीमुळे मिळणारी इम्युनिटी गमवली आहे. बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार साप्ताहिक नॉमिनेशन आणि कॅप्टनसी कार्य. “बिग बॉस मिठाईवाला” हे नॉमिनेशन कार्य रंगणार असून यामध्ये प्रत्येक सदस्याने घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी २ सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे.