बिग बॉस मराठी २- घरात नेहाने लावला सुरेखा पुणेकरांवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 01:14 PM2019-07-01T13:14:27+5:302019-07-01T13:16:47+5:30

आज घरामध्ये होणाऱ्या कार्यामध्ये नेहा आणि सुरेखाताई मध्ये वाद होणार आहे. या कार्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये माधव आणि वीणा उभे आहेत आणि विरुध्द टीमचे सदस्य त्यांच्यावर पाणी टाकताना दिसत आहेत.

Big Boss Marathi 2- Neha And Surekha Punekar New Update | बिग बॉस मराठी २- घरात नेहाने लावला सुरेखा पुणेकरांवर आरोप

बिग बॉस मराठी २- घरात नेहाने लावला सुरेखा पुणेकरांवर आरोप

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सगळ्या सदस्यांना सरप्राईझ मिळाले. महेश मांजरेकरांनी सदस्यांसाठी चॉकलेटस आणली होती आणि ज्यामुळे सदस्य खूपच खुश झाले याचबरोबर आठवड्यामध्ये वोटीग लाईन्स बंद होत्या आणि कुणीच घराबाहेर जाणार नाही असे देखील त्यांनी सांगितले त्यामुळे काल कोणताही सदस्य घराबाहेर पडला नाही... याचसोबत पराग कान्हेरे याने घरामध्ये राहू नये असे मत सगळ्या सदस्यांचे पडले आणि त्यामुळे त्याला घराबाहेर जावे लागले. आज घरामध्ये नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. घरामधील प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे, जे घरात रहाण्यासाठी अपात्र आहेत. आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी बिग बॉस यांनी काही निकष देखील सदस्यांना सांगितले. आज घरामध्ये होणाऱ्या कार्यामध्ये नेहा आणि सुरेखा यांच्या मध्ये वाद होणार आहे.


 

या कार्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये माधव आणि वीणा उभे आहेत आणि विरुध्द टीमचे सदस्य त्यांच्यावर पाणी टाकताना दिसत आहेत. ज्यामध्ये सुरेखा यांनी नेहाला बजावून सांगितले कि, साबणाच पाणी वापर करू नका. ज्यावरून वादाला सुरुवात झाली, नेहाचे म्हणणे होते कि, तुमच्या पिचकाऱ्या नाही चालत, म्हणून आम्हांला जे सुचलं आहे त्याची माती करणार का ? “स्वत: चालवायच होत डोक आहे तर मग” आणि नेहाची ही बडबड ऐकून अभिजीत केळकरने नेहाला सांगितले किती बडबड करतेस बस आता. सुरेखा यांनी तिला बजावले कि, मला साबणाच पाणी काढू दे पिचकारी दे मला...पण, नेहाच त्यावर म्हणण होत साबणाच पाणी नाहीये त्यामध्ये...नेहा पुढे म्हणाली “खेळा त्यांच्या बाजूने” त्यावर सुरेखा यांचा आवाज चढला त्या म्हणाल्या “मी त्यांच्या बाजूने नाही खेळत आहे.”

Web Title: Big Boss Marathi 2- Neha And Surekha Punekar New Update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.