बिग बॉस मराठी -२ – शिवानीला मागावी लागली किशोरी शहाणे यांची माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 01:22 PM2019-07-26T13:22:10+5:302019-07-26T13:23:16+5:30
बिग बॉस मराठी २ मधील सगळ्या स्पर्धकांमध्ये देखील आता खूप चांगली मैत्री झाली असून ते एकमेकांच्या आयुष्यातील खास गोष्टी रिकाम्या वेळात शेअर करत असल्याचे दिसून येते.
'बिग बॉस मराठी २' या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत असून या घरातील सगळेच स्पर्धक आता प्रेक्षकांचे प्रचंड आवडते बनले आहेत. तसेच रोज घडणा-या घडामोडींमुळे बिग बॉसची चर्चा सगळीकडे होत असते. घरामध्ये शिवानी आणि किशोरी शहाणे कडाक्याचे झालेले भांडण अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण त्यानंतर आता सगळ सुरळीत सुरु आहे. आज घरामध्ये अस काय घडलं ज्यामुळे किशोरी शहाणे यांना अश्रू अनावर झाले आणि शिवानीने किशोरीताईची माफी मागितली. शिवानीचे म्हणणे होते, तुम्ही म्हणाल्या चला आता तर मला वाटले कि तुम्ही बऱ्या आहात. तर किशोरी त्यावर म्हणाल्या “तू सारख विचारत होतीस म्हणून मी बोलले”.
शिवानीने सांगितली मी मज्जा करत होते, नको करू का मी तुमच्यासोबत मज्जा ? मी नाही करणार. पुढे किशोरी म्हणाल्या दिसायला खूप वाईट दिसले कारण पोट दुखत आहे. पण त्यावर शिवानीचे म्हणणे होते तुम्ही नसत म्हंटल तर मी नसत बोलले, मी इतकी इनह्युमन नाहीये”. किशोरी यांचा मूड चांगला करण्यासाठी शिवानी आज घरामध्ये बासुंदीचा बेत करणार आहे.
इतकेच नाहीतर ती किशोरी यांना ड्राईव्हला पण ती घेऊन जाणार आहे ते पण जुहू ते मरीन ड्राईव्ह असे तिने नेहाला सांगितले. बिग बॉस मराठी २ मधील सगळ्या स्पर्धकांमध्ये देखील आता खूप चांगली मैत्री झाली असून ते एकमेकांच्या आयुष्यातील खास गोष्टी रिकाम्या वेळात शेअर करत असल्याचे दिसून येते.