“मला वाटलं तुम्ही इथे पण तशाच वागणार” - मीरा जगन्नाथ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 12:39 PM2021-09-21T12:39:20+5:302021-09-21T12:40:08+5:30
मीरा आणि सुरेखा कुडची यांनी “नकळत सारे घडले” या मालिकेसाठी एकत्र काम केले होते आणि त्याचीच आठवण मीराला घरामध्ये त्यांना बघितल्यावर झाली. मीरा आज त्यांना हेच सांगताना दिसणार आहे.
अभी तो शुरुवात है आगे आगे देखो होता है क्या बिग बॉस मराठी ३ ची जोरदार सुरुवात झाली आहे. सुरुवातीलाच घरातल्या स्पर्धकांच्या कुरघोडी सुरु झाल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पाहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला आणि सदस्यांनी त्यांच्या नजरेत कोण टिकाऊ आणि कोण टाकाऊ आहे हे सांगितले.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याची दर दिवशी वेगवेगळी रूप बघायला मिळतात. कधी कधी जुन्या भेटीगाठी देखील समोर येतात. मीरा आणि सुरेखा कुडची यांनी “नकळत सारे घडले” या मालिकेसाठी एकत्र काम केले होते आणि त्याचीच आठवण मीराला घरामध्ये त्यांना बघितल्यावर झाली. मीरा आज त्यांना हेच सांगताना दिसणार आहे.
सुरेखा कुडची यांना मीरा म्हणाली, “तिकडे आपलं काहीतरी झालं होतं”, सुरेखा कुडची म्हणाल्या काय झालं होतं माझ्यासाठी रात गई बात गई... त्यावर मीरा पुढे म्हणाली, “जेव्हा मी तुम्हाला घरात पहिलं तेव्हा माझं असं झालं, बापरे या इथे पण अश्याच वागणार की काय ? मी गायत्रीला देखील बोलले, यांच्या वाईब्स खूप भारी वाटत आहेत. मी जो विचार केला होता ना तुम्हाला बघून तश्या तुम्ही नाहीच आहात, किंवा मग बाहेर वेगळं आणि इथे वेगळे वागत आहोत आपण असंही झालं माझं”. त्यावर सुरेखा यांनी विचारले तिथे काय झालं होतं त्यावर मीरा म्हणाली, “तुम्ही माझी बॅग फेकली होती”. हे ऐकून त्यांना देखील धक्का बसला. यापुढे काय झालं ? हे आगामी भागात बघायला मिळणार आहे.
किचनची सकाळची जबाबदारीसुरेखा कुडची आणि आविष्कार दारव्हेकर आणि संतोष (दादुस) चौधरी यांना देण्यात आली तर. किचनची संध्याकाळची जबाबदारी स्नेहा वाघ आणि जय दुधाणे, विशाल निकम असणार आहेत सेवक. डिशिंगची मालकीण तृप्ती देसाई आणि त्यांचे सेवक असणार आहेत उत्कर्ष शिंदे, अक्षय वाघमारे. लिव्हिंग रुम आणि डायनिंगची मालकीण आहे गायत्री दातार आणि सेवक आहेत जय दुधाणे. बेडरूमची मालकीण आहे मिरा जगन्नाथ आणि सेवक आहे आविष्कार. बाथरूमची मालकीण आहे मीनल शाह सेवक आहे विकास पाटील. GYM एरियाची मालकीण आहे सोनाली पाटील आणि संतोष (दादुस) चौधरी आहेत सेवक. गार्डन + स्वीमिंग पूल या एरियाच्या मालकीण आहेत शिवलीला पाटील आणि त्यांचे सेवक असणार आहेत विकास पाटील.