बिग बॉस मराठीमध्ये यंदा अशा अतरंगी पद्धतीने होणार नॉमिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 08:57 AM2018-06-11T08:57:56+5:302018-06-11T14:27:56+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉसला दिवसेंदिवस प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता आता सगळ्यांना ...

Big Boss Marathi will be nominated this year by an extraordinary manner | बिग बॉस मराठीमध्ये यंदा अशा अतरंगी पद्धतीने होणार नॉमिनेशन

बिग बॉस मराठीमध्ये यंदा अशा अतरंगी पद्धतीने होणार नॉमिनेशन

googlenewsNext
र्स मराठीवरील बिग बॉसला दिवसेंदिवस प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता आता सगळ्यांना लागली असून आपलाच आवडता स्पर्धक या कार्यक्रमाचा विजेता असावा असे लोकांना वाटत आहे. बिग बॉस मराठी घरामधून काल त्यागराज खाडिलकर घराबाहेर पडला. भूषण, रेशम आणि त्यागराज डेंजर झोन मध्ये होते. त्यामध्ये त्यागराजला कमी मत मिळाले असल्यामुळे तो घराबाहेर गेला. घरातून बाहेर गेल्यावर त्यागराजने माझ्याविषयी घरच्यांना काही गैरसमज असतील तर ते मनामध्ये ठेवू नका असे देखील सांगितले. आता नवीन आठवडा सुरू झाला असून बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना साप्ताहिक कार्य, कॅप्टनसीचे कार्य आणि बरेच नवे टास्क मिळणार आहेत. तेव्हा या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार? कोण बनणार नवा कॅप्टन? कोण कोणाला नॉमिनेट करणार? हे या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडणार आहे. आजची नॉमिनेशन प्रक्रिया सर्व सदस्यांसमोर पार पडणार आहे असे बिग बॉस घोषित करणार आहेत. हा खेळ वैयक्तिकरीत्या कसा खेळायचा हे प्रत्येक सदस्यावर अवलंबून आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही अपात्र सदस्य असतील ज्यांना अजूनही हा खेळ खेळता येत नाही अथवा हा खेळ समजण्या इतपत बौद्धिक चातुर्य नाही, म्हणूनच नॉमिनेशन प्रक्रिया सर्वांसमोर उघडपणे पार पाडली जाणार आहे असे बिग बॉस यांनी सदस्यांना सांगितले.
या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये घरातील प्रत्येक सदस्याला दोन सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे. ज्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे त्याच्या चेहऱ्याला शाईची पावडर फासणे अनिवार्य असणार आहे... तेव्हा कोण कोणाला नॉमिनेट करणार? कोण घराबाहेर जाणार? हे पाहाणे रंजक असणार आहे.
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेल्या आठवड्यात विकेंडचा डावमध्ये सदस्यांनी एकमेकांना वळू, खलनायक, हंटरवाली, चालबाज, बोलबच्चन अशी नावे असलेला मुकुट बहुमताने बहाल करायचा होता. ज्यामध्ये नंदकिशोर यांना खलनायक, बोल बच्चन भूषण, मेघाला चालबाज तर रेशमला हंटरवाली असे मुकुट देण्यात आले. 

Also Read : बिग बॉस मराठीच्या घरामधून त्यागराज खाडिलकर घराबाहेर !

Web Title: Big Boss Marathi will be nominated this year by an extraordinary manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.