​बिग बॉस मराठीतील या स्पर्धकाला मिळते सगळ्यात जास्त मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 08:42 AM2018-04-18T08:42:05+5:302018-04-18T14:12:05+5:30

कलर्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस या कार्यक्रमामध्ये सगळे स्पर्धक आता घरामध्ये रहायला गेले असून ते या घरामध्ये १०० ...

The Big Boss is the most respected player in Marathi | ​बिग बॉस मराठीतील या स्पर्धकाला मिळते सगळ्यात जास्त मानधन

​बिग बॉस मराठीतील या स्पर्धकाला मिळते सगळ्यात जास्त मानधन

googlenewsNext
र्स मराठीवर सुरू झालेल्या बिग बॉस या कार्यक्रमामध्ये सगळे स्पर्धक आता घरामध्ये रहायला गेले असून ते या घरामध्ये १०० दिवस राहणार आहेत. जिथे त्यांचा बाहेरच्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क राहाणार नाहीये. बिग बॉसच्या मराठमोळ्या वाड्या मध्ये जेव्हा हे १५ स्पर्धक गेले, तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या घरातील प्रत्येक गोष्ट खूपच सुंदर प्रकारे डिझाईन करण्यात आली होती आणि प्रत्येक गोष्टीवर खूप मेहनत देखील घेण्यात आली होती. बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांना घरात राहाण्यासाठी खूपच चांगले मानधन मिळाले आहे.
बिग बॉस मराठीच्या घरात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आहेत. त्यांनी केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीत देखील त्यांचे एक चांगले नाव कमावले आहे. पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी साकारलेली खाष्ट सासू प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्या करियरला एक वेगळेच वळण मिळाले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. बिग बॉसमधील इतर स्पर्धकांच्या तुलनेत उषा नाडकर्णी यांना सगळ्यात जास्त मानधन मिळते. उषा नाडकर्णींनी आज त्यांच्या अभिनयामुळे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत देखील त्यांचे एक स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे मालिकेत काम करण्यासाठी त्या खूपच चांगले मानधन घेतात. मराठी मालिकेत देखील त्यांना दिवसाला ३० ते ४० हजार रुपये मानधन मिळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठीच्या घरात जाण्यासाठी देखील त्यांना चांगलेच पैसे देण्यात आले आहेत. केवळ एका आठवड्यासाठी तब्बल त्यांना तीन ते चार लाख रुपये इतके मानधन देण्यात आले आहे. त्यांच्याप्रमाणेच तगडे मानधन रेशम टिपणीसला मिळते. रेशम देखील आज मराठी प्रमाणेच हिंदी मालिकांमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. 
राजेश शृंगारपुरेने झेंडा या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. राजेशने डॅडी, सरकार राज यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. हिंदीत खूप चांगल्या चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे राजेशला देखील चांगले मानधन मिळाले आहे. तसेच अनिल थत्ते, अस्ताद काळे यांना देखील तगडे मानधन मिळाले असल्याचे कळतेय. 

usha nadkarni

Also Read : ​हे सेलिब्रिटी बनले बिग बॉस मराठीचे स्पर्धक

Web Title: The Big Boss is the most respected player in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.