बिग बॉस टिआरपीच्या रेसमधून बाहेर... पहिल्या १०मध्येही नाही बिग बॉसचा समावेश... जाणून घ्या कोणता कार्यक्रम आहे एक नंबरला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 06:43 AM2017-10-28T06:43:47+5:302017-10-28T12:13:47+5:30
बिग बॉस या कार्यक्रमाची प्रेक्षक नेहमीच आतुरतेने वाट पाहातात. या कार्यक्रमात स्पर्धक कोण असणार याची उत्सुकता बिग बॉसच्या सिझनची ...
ब ग बॉस या कार्यक्रमाची प्रेक्षक नेहमीच आतुरतेने वाट पाहातात. या कार्यक्रमात स्पर्धक कोण असणार याची उत्सुकता बिग बॉसच्या सिझनची घोषणा झाल्यापासूनच लोकांना लागलेली असते. कारण या स्पर्धकांवरच बिग बॉसचा टीआरपी अवलंबून असतो. या सिझनमध्ये प्रेक्षकांना शिल्पा शिंदे, सपना चौधरी, हितेन तेजवानी, हिना खान, अर्शी खन, प्रियांक शर्मा, आकाश अनिल दादलानी, ज्योती कुमारी, बंदगी कार्ला, विकास गुप्ता, ढिचँक पूजा यांसारखे स्पर्धक पाहायला मिळत आहेत. पण या वर्षीचे कोणतेच स्पर्धक प्रेक्षकांना तितकेसे आवडत नाहीये असे वाटायला लागले आहे. कारण बिग बॉस सुरू झाल्यापासून या कार्यक्रमाचा टीआरपी दिवसेंदिवस कमी होत आहे. सुरुवातीचे काही आठवडे हा कार्यक्रम पहिल्या दहा मध्ये तरी होता. आता तर या कार्यक्रमाचा पहिल्या दहा मध्येही समावेश नाहीये. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान करतो. त्यामुळे त्याच्यासाठी हा एक धक्काच आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. आता या कार्यक्रमाचा टिआरपी वाढवण्यासाठी सलमान आणि बिग बॉसची टीम काय करतात हे पाहाणे मजेशीर ठरणार आहे. टिआरपी वाढवण्यासाठी आता कार्यक्रमात आणखी काही स्पर्धकांची एंट्री होणार का हे देखील प्रेक्षकांना काहीच दिवसांत कळणार आहे.
अमिताभ बच्चन हे केवळ मोठ्या पडद्यावरचे नव्हे तर ते छोट्या पडद्यावरचे देखील शहेनशहा असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. कारण कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम गेल्या अनेक आठवड्यापासून रेटिंग रेसमध्ये अव्वल आहे. या आठवड्यातही कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम पहिल्या नंबरवर आहे तर दुसऱ्या नंबरवर कुंडली भाग्य, तिसऱ्या क्रमांकावर कुमकुम भाग्य, चौथ्या क्रमांकावर सारेगामापा लिटिल चॅम्पस, पाचव्या क्रमांकावर ये रिश्ता क्या कहलाता है, सहाव्या क्रमांकावर शक्ती-अस्तित्व के एहसास की, सातव्या क्रमांकावर उडाण, आठव्या क्रमांकावर तारक मेहता का उल्टा चष्मा, नवव्या क्रमांकावर सुपर डान्सर, दहाव्या क्रमांकावर महाकाली ही मालिका आहे.
Also Read : शिल्पा शिंदेचे या अभिनेत्यासोबत होणार होते लग्न... लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या...